धकधक गर्ल माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) म्हणजे लाखो दिलाची धडकन. माधुरीच्या सौंदर्यावर, अभिनयावर मरणारे अनेक चाहते पाहायला मिळतात. ९०च्या दशकात प्रत्येक मुलाची फिक्स क्रश म्हणजे माधुरी दीक्षित. आपल्या चित्रपटांनी आणि घायाळ करणाऱ्या अदांनी तिने सगळ्यांना घायाळ केले होते. नुकतीच कपिल शर्माच्या (Kapil Sharma) कार्यक्रमात आलेल्या माधुरीला याचबद्दल विचारले असता, तिने दिलेल्या उत्तराने सगळेच थक्क झाल्याचे पहायला मिळाले. काय आहे हा प्रकार चला जाणून घेऊ.
अभिनेत्री माधुरी दीक्षित सध्या तिच्या ‘द फेम गेम या’ कार्यक्रमाच्या प्रमोशनसाठी ‘द कपिल शर्मा’च्या कार्यक्रमात पोहोचली होती. माधुरीसोबत द फेम गेमची संपूर्ण टीम म्हणजे मानव कौल, संजय कपूर, लक्षवीर सरन असे सगळे कलाकार उपस्थित होते. आता कपिल शर्माचा कार्यक्रम म्हणजे धमाला मस्ती होणारच. यावेळी ही कपिल शर्माने आपल्या खास शैलीत सर्वांना हसायला लावले. माधुरीचे कौतुक करताना तर कपिलने हद्दच केली. या धमाल एपिसोडचा प्रोमो सध्या समोर आला असून, त्यामध्ये कपिल आणि माधुरीमधील मजेशीर संवाद ऐकायला मिळत आहे.
या व्हायरल प्रोमोमध्ये कपिल शर्मा आपल्या खास अंदाजात माधुरीचे कौतुक करताना दिसत आहे. यावेळी कपिल म्हणतो की, “कॉलेजमध्ये असताना आमच्याकडे पैसे नसायचे. पण खिशात माधुरीचा फोटो मात्र असायचा. ज्यावेळी आम्ही मुलींना फूल देवून त्रास द्यायचो, तेव्हा आम्हाला असे वाटायचे की ती मुलगी म्हणजे माधुरीच आहे.” याबद्दल माधुरीचे कौतुक करताना कपिल म्हणतो की, “माधुरी अशी एकमेव अभिनेत्री आहे, जिच्या खोकल्याने सुद्धा गर्दी जमा होईल.” यावेळी माधुरीला याबाबत प्रश्न विचारताना कपिल म्हणतो की, कसे वाटते जेव्हा इतके लोक तुमच्याशी फ्लर्ट करतात. यावर अभिनेत्री माधुरीसुद्धा हसत हसत म्हणते की, “अशावेळी मला फक्त डॉ.नेनेंची आठवण येते.” माधुरीच्या या उत्तरावर सगळेच हसायला लागतात. या प्रोमोच्या व्हायरल व्हिडिओवरुन हा एपिसोड चांगलाच धमाल झाला असल्याचे दिसत आहे.
हेही वाचा
- ‘आतून मेलीये, श्वास घेता येत नाहीये’, दीप सिद्धूच्या मृत्यूनंतर गर्लफ्रेंडची भावूक पोस्ट पाहून पाणावतील डोळे
- मृत्यूनंतर बप्पी लहरी यांचे सोने जाणार तरी कुठे? मुलांनी घेतला ‘हा’ निर्णय
- Video: रक्ताने माखलेल्या सनी लिओनीची अवस्था पाहून चाहते पडले चिंतेत, म्हणाले ‘सगळं ठीक आहे ना…’
हेही पाहा-