टेलिव्हिजन इंडस्ट्रीमधील सर्वात लोकप्रिय आणि प्रसिद्ध असणारा शो म्हणजे ‘द कपिल शर्मा शो’ या शोने लोकप्रियतेचे नवनवीन विक्रम प्रस्थापित केले आहे. नेहमी विचित्र आणि हटके पद्धतीने प्रेक्षकांना पोट धरून हसवणारा हा शो म्हणजे सर्वच लोकांच्या टेन्शनवरील एक उत्तम उपाय आहे. या वर्षी फेब्रुवारी महिन्यात कपिल शर्मा शो बंद झाला. शो बंद झाल्यानंतर लगेचच कपिल शर्मा शोचा नवीन सिझन कधी सुरु होणार हा प्रश्न सर्वांच्या मनात रेंगाळत होता. मात्र ऑगस्ट महिन्यात या शोचे नवीन पर्व प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
जेव्हा हा कार्यक्रम पुन्हा सुरु होणार असे घोषित झाले तेव्हा, काही फोटो, व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यावरूनच लोकांनी अंदाज बांधला की, कपिल शर्माच्या बायकोच्या भूमिकेत दिसणारी सुमोना या पर्वात नसेल कारण कोणत्याही फोटो, व्हिडिओमध्ये ती दिसलीच नाही. त्यामुळे पुन्हा या शोवर टीका करण्यात आली होती. अनेकांनी शो बघणार नसल्यचे देखील सोशल मीडियावर जाहीर केले होते. मात्र आता सुमोनाच्या आणि कपिल शर्मा शोच्या फॅन्ससाठी एक आनंदाची बातमी आहे. या शोमध्ये सुमोना दिसणार असल्याचे समजत आहे.
मात्र चॅनेलकडून या शोचा नवीन प्रोमो प्रदर्शित करण्यात आला आहे. शिवाय सुमोनाने देखील तिच्या इन्स्टा अकाऊंटवरून एक फोटो शेअर केला आहे, त्यावरूनच सुमोना पुन्हा या शोमध्ये दिसणार हे कन्फर्म झाले आहे. सुमोनाने शेअर केलेल्या फोटोमध्ये ती व्हॅनिटी व्हॅनमध्ये बसलेली दिसत आहे.
तर सोनी चॅनलकडून शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये ती सुमोना फॉर्मल ड्रेसमध्ये दिसत असून ती म्हणत आहे की, “आता फक्त तीनच दिवस बाकी आहे. आता येणार तीन पटीने अधिक मजा, कपिल शर्मा शोमध्ये, शनिवार, रविवार रात्री नऊ वाजता.”या व्हिडिओला कॅप्शन दिले आहे की, “तुमच्या चेहऱ्यवर हसू आणण्यासाठी सुमोना तयार आहे. फक्त तीन दिवस मग हसू दोन नाही तीन पटीने वाढेल.”
अनेक महिन्यांनी कपिल शर्मा शो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या शोमध्ये या वेळेस कपिल शर्मासोबत कीकू शारदा, चंदन प्रभाकर, सुदेश लहरी, कृष्णा अभिषेक, अर्चना पूर्ण सिंग दिसणार आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-हम साथ साथ है! रिया कपूरच्या लग्नानंतर पुन्हा एकत्र आले ‘कपूर खानदान’, सोनम कपूरने केले फोटो शेअर
-व्हिडिओ: राज कुंद्राच्या अटकेनंतर शिल्पा शेट्टी पहिल्यांदाच दिसली सेटवर; चेहऱ्यावर होती उदासी
-‘बेलबॉटम’ रिलीझ होण्यापूर्वीच अक्षय कुमार पोहोचला लंडनमध्ये; ‘खिलाडी’ने घेतलीय मोठी रिस्क?