Saturday, February 22, 2025
Home टेलिव्हिजन कपिल शर्माने ‘या’ गायकासोबत जोडलं नोरा फतेहीचं नाव, म्हणाला, ‘त्याच्याशिवाय तू…’

कपिल शर्माने ‘या’ गायकासोबत जोडलं नोरा फतेहीचं नाव, म्हणाला, ‘त्याच्याशिवाय तू…’

काही काळापूर्वी गायक गुरु रंधावाचे (Guru Randhava) नाव नोरा फतेहीसोबत (Nora Fatehi) जोडले जात होते. दोघे एकमेकांना डेट करत असल्याचे सांगण्यात येत होते. सोशल मीडियावर त्यांचे काही फोटोही व्हायरल झाले होते, ज्यामध्ये दोघे एकमेकांसोबत क्वालिटी टाइम घालवताना दिसत होते. मात्र नंतर असे दिसून आले की, दोन्ही स्टार्स एका प्रोजेक्टमध्ये एकत्र काम करत होते आणि व्हायरल झालेले फोटो शूटमधीलच होते. आता कपिल शर्माने (Kapil Sharma) ‘द कपिल शर्मा शो’मध्ये नोरा फतेहीचे नाव घेत गुरु रंधवाचा मस्करी केली आहे.

नोराचे नाव घेत कपिलने गुरुचा पाय ओढला
‘द कपिल शर्मा शो’चा एक प्रोमो समोर आला आहे, ज्यामध्ये पुन्हा एकदा गुरु रंधावा शोमध्ये आलेला दिसत आहे. त्याचवेळी त्याच्यासोबत हनी सिंग (Honey Singh) आणि दिव्या खोसला कुमारही (Divya Khosla Kumar) या शोमध्ये सहभागी झाले होते. गुरूला पाहताच कपिल त्याच्याच स्टाईलमध्ये विनोद करायला लागतो. (kapil sharma teases guru randhawa in kapil sharma show)

कपिल शर्माने गुरु रंधावासोबत केली मस्ती
गुरु रंधावाला पाहून कपिल शर्मा म्हणतो, “गुरु मुलांसोबतही येतो हे जाणून मला खूप आनंद झाला. मला वाटले होते की तो नोरा फतेहीशिवाय घराबाहेर पडत नाही.” कपिलचे हे बोलणे गोष्टी ऐकून गुरु रंधावा, हनी सिंगसह शोमध्ये उपस्थित असलेले सर्व लोक जोरजोरात हसायला लागले. 

गुरु रंधावाने दिले मजेशीर उत्तर
कपिल शर्मा इथेच थांबला नाही. तो गुरू रंधावाची आणखी टिंगल करतो. “तुझ्या गाण्यात सुंदर मुली असतात. तर ती तुझ्या गाण्यांची ताकद आहे की तुला त्या मुलींकडून ताकद मिळते?” असा प्रश्न तो विचारतो. याला उत्तर देत गुरू रंधावा म्हणतो, “आम्हीही मनमोकळेपणाने नाचावे असे आम्हाला वाटते. पण मुलाला पाहून किती नाचणार!” हे ऐकून कपिल शर्मा हसायला लागला. 

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा