टेलिव्हिजन आणि बॉलिवूड कलाकारांच्या आयुष्यात अनेक चढ-उतार येत असतात. आयुष्यातील वाईट काळात काहीजण नव्याने खंबीर उभे राहतात, तर काही मात्र डिप्रेशनमध्ये जातात. लोकांना खळखळून हसवणाऱ्या कपिल शर्माच्या आयुष्यात एक असा काळ आला होता, जेव्हा त्याला वाटत होते की, तो परत कधीही टीव्हीवर शो करू शकणार नाही. यावेळी शाहरुख खानने त्याला दिलासा दिला होता. या गोष्टीचा खुलासा कपिलने स्वतः केला आहे.
कपिल शर्माने आज आयुष्यात जे काही मिळवले आहे ते स्वतःच्या मेहनतीवर मिळवले आहे. आयुष्यात सगळं काही चांगलं चालू असताना कपिल शर्मा दारूचे सेवन करत होता. एका मुलाखतीत त्याने याबद्दल सांगितले होते की, यावेळी शाहरुख खानने त्याला या परिस्थितीतून बाहेर काढले होते. कपिलने सांगितले की, त्याने दारूचे सेवन करण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर तो त्याच्या करिअरमध्ये खालीच येत होता. (Kapil sharma when wanted to commit suicide in depression revealed shahrukh khan helped him to quit drinking habit and anxiety)
कपिल शर्माने सांगितले की, शाहरुख खानने त्याला मार्गदर्शन केले होते. ‘फिरंगी’ चित्रपटादरम्यान त्याने सांगितले की, शाहरुख खानने त्याला मानसिक आणि शारीरिक रुपात मार्गदर्शन केले होते आणि दारूचे सेवन करण्यापासून सोडवले होते. कपिलने सांगितले की, तो खूप डिप्रेशनमध्ये गेला होता. त्याला मंचावर परफॉर्मन्स देण्याची भीती वाटत होती. तो त्याच्या कुत्र्यासोबत ऑफिसमध्ये बंद खोलीत बसायचा. लोकांनी त्याच्या शोमध्ये येण्याचे देखील बंद केले होते.
त्याच्या काही मित्रांनी त्याला सी फेसवरील अपार्टमेंटमध्ये राहण्याचा सल्ला दिला होता. जेणेकरून त्याचा मूड नीट होईल. परंतु अपार्टमेंट समोर समुद्र पाहून त्याला त्याच पाण्यात जीव द्यावा असे वाटत होते.
कपिलने डिप्रेशनमध्ये जाण्याचे कारण त्याची नकारात्मक लोकप्रियता असे सांगितले होते. त्यावेळी त्याला असे वाटत होते की, संपूर्ण जग त्याला गोळ्या मारत आहे. तसेच लोकांनी केलेल्या ट्वीटमुळे त्याला जास्त त्रास होत होता. त्यावेळी त्याच्याजवळ या नकारात्मक पब्लिसिटीपासून वाचवण्यासाठी पीआर नव्हता. परंतु त्यावेळी शाहरुख खानने त्याला या परिस्थितीतून बाहेर काढले होते.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-अक्षय कुमारसोबत काम करण्यासाठी कपिल शर्मा करणार का त्याची ‘ही’ मोठी अट मान्य?
-रोमँटिक अंदाजात पोझ देत होते अक्षय अन् कॅटरिना, कपिल शर्मा बनला ‘कबाब में हड्डी’
-‘कपिल शर्मा शो’मध्ये कृष्णाने जॅकी श्रॉफ बनून केला विनोद; ऐकून जुही अन् मधूही झाल्या लोटपोट










