अभिनेत्री आलिया भट्ट हिने १४ एप्रिल, २०२२ रोजी अभिनेता रणबीर कपूर याच्यासोबत साताजन्माची लग्नगाठ बांधली. आता आलिया कपूर खानदानाची सूनबाई बनली आहे. विशेष म्हणजे, लग्नाच्या अवघ्या २ महिन्यांनंतर लगेच आलियाने तिच्या प्रेग्नंसीची घोषणा केली होती. तेव्हापासून आतापर्यंत चाहते तिची प्रत्येक झलक पाहण्यासाठी आतुर असतात. माध्यमांतील वृत्तांनुसार, आलिया आणि रणबीर यांच्या पहिल्या बाळासाठी चाहत्यांसोबतच आता त्यांचे कुटुंबही उत्सुक आहे. असे म्हटले जात आहे की, रणबीर आणि आलियाच्या बाळासाठी आणि आलियाच्या डिलीव्हरीसाठी कपूर खानदान एक खास पूजा ठेवत आहे, ज्याची तयारी जोरात सुरू आहे.
रणबीर- आलियाच्या बाळाच्या स्वागताची तयारी?
माध्यमांतील वृत्तांनुसार, कपूर खानदान एका खास पूजेची तयारी करत आहे. ही पूजा त्यांच्या घरात येणाऱ्या नवीन पाहुण्यासाठी म्हणजेच रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) हिच्या बाळासाठी आहे. कपूर खानदान दरवर्षी गणेश चतुर्थी एकसोबत साजरी करतात. यावेळची गणेश चतुर्थी त्यांच्यासाठी आणखीच खास आहे. गणेश चतुर्थीच्या दिवशी रणबीर, आलिया आणि त्यांच्या येणाऱ्या बाळासाठी एका खास पूजा ठेवत आहेत, जी आलियाच्या डिलीव्हरी आणि सर्वांच्या चांगल्या आरोग्याच्या प्रार्थनेसाठी आहे.
View this post on Instagram
आलियाचा बंप
आलिया भट्ट ही प्रेग्नंसीच्या घोषणेनंतर पहिल्यांदा ‘डार्लिंग्स’ या सिनेमाच्या प्रमोशनदरम्यान दिसली होती. त्यानंतर आलिया अनेकदा दिसली आहे. आता ती रणबीरसोबत अयान मुखर्जी यांच्या ‘ब्रह्मास्त्र’ या सिनेमात दिसणार आहे. त्यासाठी ती जोरात प्रमोशन करत आहे. आलियाच्या प्रत्येक वेशभूषेत तिचे बेबी बंप वाढल्याचे दिसत आहे. त्यामुळे चाहतेही भलतेच खुश आहेत.
आलिया ही शेवटची ‘डार्लिंग्स’ या सिनेमात झळकली होती. हा सिनेमा ५ ऑगस्ट रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला होता. या सिनेमाचे दिग्दर्शन जस्मीत के. रीन यांनी केले होते. आलियाच्या ताफ्यात अनेक सिनेमे आहेत. ती ‘हार्ट ऑफ स्टोन’, ‘तख्त’ आणि ‘रॉकी और रानी की कहाणी’ यांसारख्या सिनेमात दिसणार आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
बिपाशाच्या बेबी बंपजवळ जात पती करणने गायले गाणे; व्हिडिओ पाहून चाहताही म्हणाला, ‘नजर न लागो’
‘थोडंही वजन वाढलेल्या अभिनेत्रीला प्रेक्षक सहजासहजी स्वीकारत नाहीत,’ सुबोधच्या प्रश्नावर काय म्हणाली ऋता?
कधीकाळी चॉकलेट-चिंगम आणि कॅसेट विकायचे मधुर भांडारकर, स्वत:वर विश्वास ठेवल्याने आज आहेत सुपरहिट दिग्दर्शक