बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री कॅटरिना कैफ सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. कॅटरिनाने सुरुवाती पासूनच चाहत्यांवर आपला प्रभाव पाडला आहे. तिला बॉलिवूडची ‘बार्बी डॉल’ म्हणूनही ओळखले जाते. कॅटरिना तिच्या क्यूटनेस तसेच तिच्या बोल्डनेससाठी ओळखली जाते. त्याचबरोबर तिने नुकताच तिचा पुढील चित्रपट ‘टायगर ३’ च्या तुर्कीमध्ये शूटिंगचे वेळापत्रक पूर्ण केले आहे. चाहते त्याच्या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.
त्याचबरोबर कॅटरिनाचे डान्स व्हिडिओ आणि तिचे ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. याच दरम्यान तिचा आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यात कॅटरिना कठीण वर्कआउट करताना दिसत आहे.
कॅटरिनाने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती खूप मेहनत करताना दिसत आहे. या व्हिडिओसह तिने जबरदस्त कॅप्शन देखील लिहिले आहे. तिने लिहिले आहे की, “माझ्या मनाला प्रशिक्षित करत आहे… माझे शरीर अनुकरण करेल…आणि तसे झाले नाही, तर मी फक्त @rezaparkview ला कॉल करते.”
हा व्हिडिओ पाहून चाहते देखील तिच्या उत्साहाचे कौतुक करत आहेत. त्याचबरोबर तिच्या एका चाहत्याने “सुपरस्लॉडीयर फॉर द रेस्क्यू,” अशी प्रतिक्रिया दिली आहे. दुसऱ्या एका चाहत्याने लिहिले की, “खूप चांगले.”
अभिनेत्री कॅटरिना कैफ लवकरच अभिनेता सलमान खानसोबत ‘टायगर ३’ या चित्रपटात दिसणार आहे. ही दोघांची हिट फ्रँचायजी आहे आणि यामध्ये ते जबरदस्त ऍक्शनमध्ये दिसत आहेत. त्याचबरोबर अक्षय कुमारसोबत तिचा ‘सूर्यवंशी’ हा चित्रपटही लवकरच चाहत्यांच्या भेटीला येणार आहे, पण या अगोदर कोरोना कालावधीमुळे हा चित्रपट प्रदर्शित झाला नाही. याशिवाय कॅटरिना कैफ ‘फोन भूत’मध्ये सिद्धार्थ चतुर्वेदी आणि ईशान खट्टरसोबत दिसणार आहे. यामध्ये, प्रेक्षकांना भयपट आणि विनोदाचा उत्तम तडका पाहायला मिळेल.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-राकेश मिश्राचे ‘हे’ गाणे रिलीझ; सोमेया पांडेसोबतच्या केमिस्ट्रीला मिळतेय चाहत्यांची पसंती
-राखी सावंतचा AAP नेते राघव चड्ढांना इशारा; म्हणाली, ‘माझ्या नावापासून दूर राहा, नाहीतर त्याचा…’
-‘विश्वातील सर्वात सुंदर मुलगी’, राजेश्वरी खरातच्या ग्लॅमरस अंदाजावर होतोय कौतुकाचा वर्षाव