[rank_math_breadcrumb]

पत्नीला फसवत होता करण औजला? गर्लफ्रेंडने पुरावे दाखवत उघडकीस आणले सत्य; ‘मला गप्प बसायला भाग पाडलं गेलं होतं’ असा आरोप

पंजाबी म्युझिक इंडस्ट्रीतील प्रसिद्ध गायक करण औजला पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. अमेरिकेत msgorimusic या नावाने ओळखल्या जाणाऱ्या एका कलाकाराने करण औजलावर गंभीर आरोप केले आहेत. तिचा दावा आहे की तिचे करण औजलासोबत खाजगी संबंध होते, मात्र तो आधीच विवाहित आहे याची तिला माहिती नव्हती. करण औजलाचे पलक औजला यांच्याशी लग्न झालेले आहे.

अमेरिकन कलाकाराचा आरोप आहे की, जेव्हा तिने या नात्याबाबत प्रश्न उपस्थित करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा तिला गप्प करण्यात आले आणि सार्वजनिकरित्या लाजवण्यात आले. इतकेच नव्हे, तर संपूर्ण प्रकरण दडपण्यासाठी करण औजलाच्या टीमने एका भारतीय सोशल मीडिया इन्फ्लुएंसरशी संपर्क साधून तिच्याविरोधात खोटी माहिती पसरवली, असा दावाही तिने केला आहे.

या प्रकरणाला आणखी वेग तेव्हा मिळाला, जेव्हा रेडिटवर त्या कलाकाराच्या विधानाचा स्क्रीनशॉट व्हायरल झाला. या पोस्टमध्ये तिने दावा केला आहे की कॅनडा आणि अमेरिकेतील पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत. तिच्या म्हणण्यानुसार, तिच्यावर खोटे गुन्हेगारी आरोप पसरवण्यात आले, जे पाश्चात्य देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले, तर भारतात ते जाणूनबुजून दाबले गेले.

तिने हेही सांगितले की, एका प्रमुख अमेरिकन मीडिया हाऊसकडून तिची मुलाखत घेण्याची तयारी सुरू आहे. त्यामुळेच तिने पहिल्यांदाच आपली बाजू सार्वजनिकपणे मांडण्याचा निर्णय घेतला. “मला माझी कहाणी सांगण्याचा पूर्ण अधिकार आहे,” असे ती म्हणते. तिच्या मते, अनेक भारतीय सेलिब्रिटींनी खासगीरित्या संपर्क साधून तिच्या धैर्याचे कौतुक केले आहे.

सोमवार, १२ जानेवारी रोजी तिने आणखी एक लांबलचक विधान शेअर केले. यात तिने म्हटले की, सत्य बोलणाऱ्यांमुळे मौनाचा फायदा घेणारे लोक अस्वस्थ होतात. “अनेक महिलांना हाताळले गेले आहे, त्यांना लाजवले गेले आहे आणि जबाबदारी टाळण्यासाठी त्यांच्या कथा बदलल्या गेल्या आहेत. मी आता या पद्धतीचा भाग राहणार नाही,” असे तिने स्पष्ट केले. महिलांनी त्यांच्या सत्यासाठी उभे राहावे आणि आपला आवाज दाबू देऊ नये, असे आवाहनही तिने केले.

या आरोपांवर आणि सोशल मीडियावर सुरू असलेल्या चर्चेवर करण औजला (Karan Aujla)किंवा त्याच्या टीमकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. त्यामुळे सध्या हे प्रकरण आरोप–प्रत्यारोपांमध्ये अडकलेले असून, सत्य काय आहे हे अधिकृत स्पष्टीकरणानंतरच स्पष्ट होणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा
टायगर श्रॉफनंतर दिशा पाटनीच्या आयुष्यात नवा सिंगर? ५ वर्षांनी लहान, चेहरा लपवणाऱ्या तलविंदरसह रोमँटिक क्षण व्हायरल