Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

करण सिंग ग्रोव्हरच्या एक्ससाईज व्हिडिओवर चाहत्यांसोबत पत्नी बिपाशा बासूही फिदा, एकदा पाहाच

बॉलिवूड अभिनेत्री बिपाशा बासू आणि तिचा पती करण सिंग ग्रोव्हरची प्रेमकथा आपणा सर्वांनाच माहिती आहेत. करणचे हे तिसरे लग्न आहे. प्रथम त्याने श्रद्धा निगमशी लग्न केले. पुढे जेनिफर विंगेटसह सेटल झाला. पण हे दोन्ही विवाह फार काळ टिकू शकले नाहीत. त्यांनतर तो बिपाशा बसूसह लग्नबंधनात अडकला. सोशल मीडियाच्या माध्यमातून हे दोघे सतत प्रेम व्यक्त करताना दिसतात. आता करणने शेअर केलेल्या व्हिडिओवर बिपाशाने प्रेम व्यक्त केले आहे.

वास्तविक, करण फिटनेसबाबत खूपच गंभीर आहे. वर्कआउटसाठी दिवसातील काही तास घालवणे त्याला आवडते. करणने नुकताच त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तो खूप कठोर पद्धधतीचा व्यायाम करताना दिसत आहे. हा व्हिडिओ शेअर करत त्याने कॅप्शनमध्ये ‘लेविटेट’ लिहिले आहे. करणचा हा व्यायाम पाहून, स्पष्ट कळून जाते की, हे करणे किती कठीण असेल.

त्याचवेळी करणची पत्नी बिपाशाने या व्हिडिओवर कमेंट करत तिचे प्रेम व्यक्त केले आहे. बिपाशाने लिहले, “आता हाच व्यायाम एका हाताने करा.” तसेच हे जोडपे सोशल मीडियाद्वारे एकमेकांवर प्रेम व्यक्त करायची संधी कधीही चुकवत नाहीत.

सन 2016 मध्ये या दोघांनी लग्न केले होते. अलीकडेच जेव्हा एकदा त्याला मुलाबद्दल विचारले, तेव्हा करण म्हणाला की, “आयुष्यात मूल होणे सामान्य गोष्ट आहे, परंतु आता त्यापूर्वी आपण काहीतरी तयारी केली पाहिजे.”

बिपाशाने 2001 साली ‘अजनबी’ या चित्रपटात नकारात्मक भूमिका साकारत बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटातील तिच्या अभिनयासाठी तिला फिल्मफेअर अवॉर्डने सन्मानित करण्यात आले. यानंतर 2002 मध्ये तिने ‘राज’ या हॉरर चित्रपटात मुख्य भूमिका साकारली. हा चित्रपट जबरदस्त हिट ठरला. पुढे बिपाशाने अनेक हिट चित्रपटात काम केले. आता बिपाशा येत्या काही वर्षांत ‘डेंजरस’ चित्रपटाद्वारे मोठ्या पडद्यावर पुनरागमन करणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-संगीतकाराने भावाच्या नावालाच बनवले आपले आडनाव, म्हणाला ‘माझं नाव साजिद वाजिद असं आहे आणि…’

-‘या’ कारणामुळे राजपाल यादवला खावी लागली होती ‘जेलची हवा!’ तुरूंगातही वाजवला आपल्या विनोदी अंदाजाचा डंका

-बनायचे होते अभिनेता, पण ‘मला संधीच मिळाली नाही’ म्हणत गायकाने केला अपूर्ण स्वप्नाचा खुलासा

हे देखील वाचा