निर्माता, दिग्दर्शक करण जोहरचा २०२२ हे वर्ष खूपच चांगले यशस्वी ठरले. त्याच्या ‘ब्रह्मास्त्र’ सिनेमाने बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करत बक्कळ पैसा कमवला. यानंतर त्याचा दुसरा ‘गोविंदा मेरा नाम’ या सिनेमाने देखील लोकांमध्ये चांगलीच लोकप्रियता मिळवली. यावर्षी करण आलिया आणि रणवीर यांना घेऊन ‘रॉकी और राणी की प्रेम कहाणी’ हा सिनेमा घेऊन येणारच आहे. मात्र आता त्याने त्याच्या नवीन प्रोजेक्टची घोषणा केली आहे.
नुकतेच करण जोहरने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर करत त्याच्या आगामी सिनेमाची घोषणा केली आहे. मात्र त्याने त्याने त्याच्या पोस्टमधून त्याच्या नवीन सिनेमाचे नाव जाहीर केले नसून, फक्त सिनेमाची स्टारकास्ट आणि प्रदर्शनाची तारीख सांगितली आहे. त्याच्या या नवीन सिनेमात विकी कौशल, एमी विर्क आणि तृप्ति डिमरी मुख्य भूमिकेत झळकणार आहे. या प्रोजेक्टच्या निमित्ताने पुन्हा एकदा करण विकीसोबत काम करताना दिसणार आहे.
View this post on Instagram
करण जोहरने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट शेअर करताना लिहिले, “आम्ही तुमच्यासाठी टॅलेन्टचे तीन पॉवर हाऊस घेऊन येणार आहोत. विक्की कौशल, तृप्ति डिमरी आणि एमी विर्क. यांना आनंद तिवारी दिग्दर्शित करतील. चित्रपटाचे नाव अजून ठेवले नसले तरी हा सिनेमा २५ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होईल. या नवीन सिनेमासाठी करण जोहरने आनंद तिवारी यांना दिग्दर्शक म्हणून साइन केले आहे. आनंद तिवारी हे दिग्दर्शनसोबतच एक अभिनेते देखील आहे. त्यांनी मागच्यावर्षी आलेली माधुरी दीक्षितची ‘मजा मा’ ही सिरीज दिग्दर्शित केली होती.
तत्पूर्वी करण जोहारचे दिग्दर्शन असणारा ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ हा सिनेमा २८ जुलै रोजी प्रदर्शित होणार असून, यात आलिया आणि रणवीरसोबत धर्मेंद्र, जया बच्चन आणि शबाना आजमी हे कलाकार दिसणार आहे.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक कर
हेही वाचा
सिद्धार्थ आणि कियाराच्या लग्नावर कंगना रनौतची प्रतिक्रिया; म्हणाली, ‘इंडस्ट्रीमध्ये कदाचितच खरं प्रेम…
सिद्धार्थ मल्होत्राला बळजबरी कियारा अडवाणीला करावा लागलं होतं किस, वाचा तो रंजक किस्सा