Monday, July 1, 2024

भारीच ना! करण जोहरने लावले कंगना रणौतच्या ‘या’ गाण्यावर ठुमके, व्हिडिओ रिट्विट करत अभिनेत्री म्हणाली…

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत ही सोशल मीडियावर कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. अनेक सामजिक प्रश्नांवर अनेकवेळा ती तिचे मत मांडताना दिसत असते. सध्या ती तिच्या ‘थलायवी’ या चित्रपटामुळे सर्वत्र चर्चेत आहे. नुकताच तिच्या या चित्रपटातील ‘चली चली’ हे गाणे रिलीझ झाले आहे. तिचे हे गाणे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या चित्रपटात कंगना तमिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांची भूमिका निभावताना दिसत आहे.

अशातच सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये करण जोहर कंगनाच्या चली चली या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. या व्हिडिओमधील गाण्याला डब केले आहे. कंगनाने हा व्हिडिओ रिट्विट करून लिहिले आहे की, #chalichalichallenge चा हा बेस्ट व्हिडिओ आहे.

https://twitter.com/KanganaTeam/status/1378355206950252547

खरंतर करण जोहर याचा व्हायरल झालेला हा व्हिडिओ सोनम कपूर हिच्या लग्नातील आहे. त्यावेळी कारण जोहर सोबत अनेक कलाकारांनी डान्स केला होता. करणने ‘प्रेम रतन धन पायो’ या गाण्यावर डान्स केला होता. पण कंगनाने शेअर केलेल्या या मजेशीर व्हिडिओला सोशल मीडियावर खूपच पसंती मिळत आहे.

कंगना रणौत ही जयललिता यांच्या बायोपिकमध्ये काम करताना दिसणार आहे. ‘थलायवी’ चित्रपटातील चली चली हे गाणे शुक्रवारी (2 एप्रिल) रिलीझ झाले आहे. या चित्रपटाच्या दिग्दर्शकाने असे सांगितले की, या गाण्याच्या शूटिंगसाठी कंगनाने एक महिना खूप कठीण परिश्रम घेतले आहे. हे गाणे पाण्यात शूट झाले आहे. त्यामुळे कंगना जवळपास 24 तास पाण्यात उभी राहिली होती.

‘थलायवी’ या चित्रपटाचे दिग्दर्शक ए. एल. विजय यांनी असे सांगितले की, “आम्ही जयललिता यांचा जीवन प्रवास सगळ्यांसमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे. यामागे आमची खूप मेहनत आणि रिसर्च आहे. हा चित्रपट 3 भाषांमध्ये बनवला जाणार आहे. हिंदी, तेलुगु आणि तमिळ भाषेमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.”

कंगनाचा ‘थलायवी’ चित्रपट 23 एप्रिल, 2021 रोजी रिलीझ होणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-Video: ‘गली बॉय’ फेम अभिनेता सिद्धांत चतुर्वेदीला राग अनावर; केला दिग्दर्शक शकुन बत्रावर जोरदार हल्ला

-नया है यह! झरीन खानने दाखवले ‘डोन्ट रश’चे नवीन व्हर्जन, पाहा अभिनेत्रीचा जबरदस्त व्हिडिओ

-आलिया भट्टपासून ते सोनम कपूरपर्यंत ‘या’ अभिनेत्रींचे नयनरम्य किचन डेकोरेशन पाहून तुम्हीही घालाल तोंडात बोटे!

हे देखील वाचा