टेलिव्हिजनवरील सर्वात लोकप्रिय असणारा सिंगिंग रियालिटी शो ‘इंडियन आयडल १२’ त्याच्या अखेरच्या टप्प्यावर येऊन पोहचला आहे. मागील १० महिन्यांपासून सर्वांचे मनोरंजन करणारा आणि प्रेक्षकांचे अमाप प्रेम मिळवणाऱ्या या शोचा पुढच्या आठवड्यात अंतिम भाग प्रसारित होणार आहे. तत्पूर्वी फिनाले आधीच्या भागात दिग्दर्शक, निर्माता करण जोहरने हजेरी लावली होती. हा संपूर्ण भाग करण जोहरच्या गाण्यांनी तुफान रंगला. करण आणि सर्व स्पर्धकांनी खूप मजा मस्ती देखील केली. अनेक भावनिक क्षण देखील या भागात पाहायला मिळाले.
पवनदीप राजन, शनमुखप्रिया, अरुणिता कांजीलाल, सायली कांबळे, निहाल, मोहम्मद दानिश या सहा स्पर्धकांनी करणच्या चित्रपटातील हिट गाणी गात त्याचे मनोरंजन केले. या शोमध्ये करणने त्याच्या एवढ्या मोठ्या सिनेप्रवासातील अनेक गोष्टी सर्वांना सांगितल्या. अशातच स्पर्धकांनी गाणी गात करणला प्रभावित केले. करणने देखील सर्वांचे अगदी भरभरून कौतुक केले. त्यानंतर स्टेजवर गाणे गायला आला तो सर्वांचाच लाडका पवनदीप राजन. (karan johar offer pawandeep rajan for sing a song for dharma production)
पवनदीपने ‘अग्निपथ’मधील ‘अभी मुझमे कही’ आणि ‘ए दिल है मुश्किल’मधील ‘चन्ना मेरे या’ ही दोन गाणी गायली. ही गाणी ऐकून करण जोहर इतका प्रभावित झाला की, त्याने पवनदीपला थेट ‘धर्मा प्रोडक्शन’साठी गाण्याची ऑफर दिली. करणने पवनदीपला त्याचे गाणे झाल्यानंतर ‘धर्मा’मध्ये येण्यासाठी आमंत्रण दिले आहे. पवनदीपचे गाणे ऐकून करण त्याला म्हणाला, “तू प्लिज धर्मामध्ये येशील का?” हे ऐकून तिन्ही परीक्षक खूपच खुश झाले आणि सर्वांनी पवनदीपला या एवढ्या मोठ्या संधीसाठी खूप शुभेच्छा देत अभिनंदन केले.
येत्या १५ ऑगस्ट रोजी या शोचा अंतिम भाग प्रसारित केला जाणार असून, याच दिवशी देशाला इंडियन आयडलच्या १२ व्या पर्वाचा विजेता मिळणार आहे. सध्या या शोमध्ये सायली कांबळे, पवनदीप राजन, अरुणिता कांजीलाल, शनमुखप्रिया, मोहम्मद दानिश आणि निहाल हे सहा स्पर्धक असून यांच्यापैकीच एक इंडियन आयडल पर्वाचा विजेता होणार आहे.
करण जोहरसोबत या सर्व स्पर्धकांचा एक फोटो व्हायरल झाला असून, यात करणसोबत पवनदीप सोडून सर्व स्पर्धक दिसत आहे. त्यामुळे असा अंदाज लावला जात आहे की, पवनदीप एलिमनेट झाला असावा. यावरून लोकांच्या अनेक प्रतिक्रिया देखील येत आहे. आता नक्की कोण होणार एलिमनेट आणि कोण होणार इंडियन आयडल हे येणारी १५ ऑगस्ट ही तारीखच आपल्याला सांगेल.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-स्वीटू-ओमचं लवकरच होणार लग्न? ‘त्या’ फोटोमुळे प्रेक्षकांमध्ये चर्चेला उधाण
-कराऱ्या नजरेने घायाळ करणाऱ्या कियाराचा ‘हा’ फोटो पाहिला का? कलरफुल आऊटफिट गजब दिसतेय अदाकारा
-हीना पांचाळचे ठुमके पाहून हरपले चाहत्यांचे भान; भन्नाट डान्स व्हिडिओ झाला व्हायरल