Tuesday, July 9, 2024

केवळ सलमान खानच नव्हे, तर बिश्नोई गँगच्या हिटलिस्टमध्ये करण जोहरचंही नाव, ‘अशी’ होती प्लॅनिंग

बॉलिवूड अभिनेता सलमान खानला (Salman Khan) धमकी देणाऱ्या प्रकरणाच्या तपासादरम्यान, एक मोठा खुलासा समोर आला आहे. सिद्धू मुसेवाला (Sidhu Moosewala) आणि मकोका प्रकरणात अडकलेला आरोपी सौरव कांबळे उर्फ ​​महाकाळ याच्या चौकशीदरम्यान, बिश्नोई गँगच्या निशाण्यावर केवळ सलमान खानच नसून इंडस्ट्रीतील प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माता करण जोहरही (Karan Johar) होता, अशी माहिती मिळाली आहे. पुणे पोलिसांच्या चौकशीदरम्यान महाकाळने हा खुलासा केला आहे.

सलमान खान धमकी प्रकरणी सौरव उर्फ ​​महाकाळ याने पुणे पोलिसांच्या चौकशीदरम्यान दिलेल्या जबानीनुसार, सलमान खान व्यतिरिक्त चित्रपट निर्माता करण जोहरचेही नाव बिश्नोई गँगच्या बॉलिवूडमधील हिटलिस्टमध्ये आहे. सौरवने पुणे पोलिसांना दिलेल्या जबाबानुसार, सुशांत सिंग राजपूतच्या (Sushant Singh Rajput) मृत्यूला करण जोहर प्रामुख्याने जबाबदार होता आणि त्यामुळेच त्याचाही बिश्नोई गँगच्या हिटलिस्टमध्ये समावेश झाला होता. याच कारणावरून चित्रपट निर्माता करण जोहरला धमकावून बिष्णोई गँग ५ कोटींची खंडणी वसूल करण्याची तयारी केली होती. (karan johar name in lawrence bishnoi gang after salman khan)

चौकशीदरम्यान सौरवने असेही सांगितले आहे की, सिग्नल ऍपद्वारे तो विक्रम बरारशी जोडला गेला होता. तो फक्त विक्रम बरारसाठी काम करत आहे, त्यामुळे त्याला बिश्नोई गँगच्या अनेक हालचाली आणि लक्ष्यांची माहिती होती. सध्या पुणे पोलीस महाकाळच्या या वक्तव्यातील सत्यता जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत.

सिद्धू मुसेवाला हत्याकांड आणि सलमान खानला धमकावणाऱ्या सौरव महाकाळला, पुणे पोलिसांनी काही दिवसांपूर्वीच अटक केली आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा