Saturday, August 2, 2025
Home बॉलीवूड धक्कादायक! करण जोहरला संपवायचे होते ‘या’ टॉपच्या अभिनेत्रीचे करियर, स्वतःच केला हा खुलासा

धक्कादायक! करण जोहरला संपवायचे होते ‘या’ टॉपच्या अभिनेत्रीचे करियर, स्वतःच केला हा खुलासा

बॉलिवूडमधील यशस्वी अभिनेत्रींच्या यादीत अनुष्का शर्मा हे नाव प्रकर्षाने घेतले जाते. तिने तिच्या मेहनतीने आणि जिद्दीने बॉलिवूडमध्ये मोठे यश तर मिळवले सोबतच टॉपच्या अभिनेत्रींमध्ये देखील स्थान मिळवले आहे. मागील अनेक महिन्यांपासून अनुष्का जरी चित्रपटांपासून लांब असली तरी ती नेहमीच मीडियामध्ये आणि बॉलिवूडमध्ये चर्चेत असते. ती सध्या तिचे मदरहूड एन्जॉय करत असून तिच्या मुलीला वामिकाला वेळ देत आहे. एक अभिनेत्री म्हणून यश मिळवल्यानंतर अनुष्काने एक निर्माती म्हणून देखील नावलौकिक मिळवला आहे. मात्र एक काळ असा होता जेव्हा तिचे करियर धोक्यात होते, आणि तिच्या करियरला करण जोहरला संपवायचे होते. खुद्द करणनेच याचा खुलासा केला आहे.

करण जोहरने एकदा मोठ्या आणि जास्त लोकांसमोर ही गोष्ट मान्य केली होती की, त्यानेच आदित्य चोप्राला ‘रब ने बना दी जोडी’ सिनेमासाठी अनुष्का शर्माला साईन कटण्यासाटःई विरोध केला होता. अशा बातम्या होत्या की, करणच अशी इच्छा होती की, त्या सिनेमासाठी आदित्यने सोनमला साईन करावे. मात्र जेव्हा बँड बाजा बारात तयार झाला तेव्हा इच्छा नसूनही त्याला तो सिनेमा पाहावा लागला. त्यानंतर तो अनुष्काच्या अभिनयाने प्रभावित झाला आणि त्याने तिची माफी मागण्याचे ठरवले. जर खरंच आदित्यने करणचे ऐकले असते तर अनुष्काचे करियर संपले असते.

 

View this post on Instagram

 

A post shared by AnushkaSharma1588 (@anushkasharma)

करण जोहर त्याचा ‘ए दिल है मुश्किल’ हा सिनेमा प्रमोट करण्यासाठी २०१६ साली १८ व्या मामी मुंबई फिल्म फेस्टिवलमध्ये पोहचला होता. त्याच्यासोबत ऐश्वर्या आणि अनुष्का देखील होत्या, तेव्हा त्याने राजीव मसंद आणि अनुपमा चोप्रा यांच्याशी बोलताना ही गोष्ट कबुल केली होती. करण म्हणाला , “जेव्हा मला आदित्यने रब ने बना दी जोडी या सिनेमाबद्दल सांगितले तेव्हा मी त्या म्हणालो तू वेडा आहेस का…हे काय करतोय…तुला अनुष्का शर्माला घेण्याची काहीही गरज नाही. त्यावेळी मला दुसरी एक अभिनेत्री त्या सिनेमात पाहिजे होती. मात्र आदित्यने माझे ऐकले नाही. मी तो सिनेमा मन नसताना देखील पाहिला.”

पुढे करण म्हणाला, “मात्र जेव्हा मी बँड बाजा बारात सिनेमा पाहिला तेव्हा मी तिला फोन केला मला वाटले मी माफी मागितली पाहिजे. माफी मागितली आणि तिच्या अभिनयाचे कौतुक देखील केले. दरम्यान अनुष्का शर्माने २००८ साली शाहरुख खानच्या रब ने बना दी जोडी सिनेमातून पदार्पण केले होते. त्यानंतर तिने अनेक यशस्वी सिनेमे केले.

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘गर्व, लाइफस्टाइलमध्ये पैसा…’ चित्रपटांच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनवरून विवेक अग्निहोत्री यांनी साधला सुपरस्टार्सवर निशाणा

मोठी बातमी! प्रसिद्ध मराठी अभिनेत्याचे निधन, वयाच्या 69व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

 

हे देखील वाचा