Monday, July 8, 2024

करण जोहरने आलिया भट्टसोबत खेळला मजेदार रॅपिड फायर राऊंड, अभिनेत्रीनेही दिली धमाकेदार उत्तरे

बॉलिवूड निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहर याला नुकतेच ‘पद्मश्री’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. यामुळे तो सध्या जोरदार चर्चेत आहे. सोशल मीडियावर त्याला शुभेच्छा मिळत आहेत. यासोबतच तो आलिया भट्ट आणि रणवीर सिंग यांचा आगामी चित्रपट ‘रॉकी और रानी की प्रेमकहानी’मुळे देखील जोरदार चर्चेत आहे. ‘कॉफी विथ करण’ शोमध्ये तो नेहमीच कलाकारांचे रॅपिड राऊंड घेत असतो. अशातच त्याने हा खेळ आलिया भट्टसोबत खेळला आहे. त्याने अगदी पटापट तिच्याकडून सगळ्या प्रश्नांची उत्तरे घेतली.

करण जोहर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असतो. नुकताच त्याने एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये तो आलिया भट्टसोबत रॅपिड राऊंड खेळताना दिसत आहे. ‘रॉकी और रानी की प्रेमकहानी’च्या सेटवर करणने आलियासोबत हा खेळ खेळला आहे. ( Karan Johar play rapid fire with alia bhatt while shooting rocky aur rani ki prem kahani)

यावेळी करणने आलियाला विचारले की, “आपण शूटिंग करत आहोत…” यावर आलिया उत्तर देते की, “रॉकी और रानी की प्रेमकहानी.” करण विचारतो की, “रॉकी कुठे आहे?” आलिया उत्तर देते की, “वर्कआऊट करत आहे.” आलिया उत्तर देताना कन्फ्युज होते. यावेळी करण म्हणतो की, “हा काही अवघड खेळ नाहीये.” यावेळी आलिया म्हणते की, तिला रॅपिड फायर खूप आवडतो.

करण पुढे विचारतो की, “या सिझनचे सर्वात आवडते गाणे कोणते?” यावर आलिया ‘लव्हर’ आणि ‘राता लंबिया’, हे उत्तर देते. तो तिला आवडता चित्रपट विचारतो तेव्हा ती, “सूर्यवंशी” असे उत्तर देते. यासोबत करणने तिला विचारले की, “सक्सेशन पाहायला आवडते का? कोणत्या सीनने तिला प्रेरित केले?” यावर आलियाने उत्तर दिले की, “जेव्हा करण जोहरला पद्मश्री पुरस्कार मिळाला.” हा व्हिडिओ शेअर करून करणने “रात्रीची शूटिंग, पुढचा व्हिडिओ रॉकीसोबत” असे कॅप्शन दिले आहे.

‘रॉकी और रानी की प्रेमकहानी’ या चित्रपटात धर्मेंद्र, जया बच्चन आणि शबाना देखील दिसणार आहे. २००६ मध्ये ‘ए दिल है मुश्किल’ यानंतर करण दिग्दर्शन करणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हे देखील वाचा