Monday, June 9, 2025
Home बॉलीवूड ‘केजीएफ’च्या यशावर अखेर करण जोहरने सोडले मौन; म्हणाला, ‘आम्ही असा चित्रपट बनवला तर…’

‘केजीएफ’च्या यशावर अखेर करण जोहरने सोडले मौन; म्हणाला, ‘आम्ही असा चित्रपट बनवला तर…’

प्रशांत नील दिग्दर्शित ‘केजीएफ’चे दोन भाग आतापर्यंत प्रदर्शित झाले असून, या दोन्ही चित्रपटांना प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले आहे. यश (Yash) अभिनित या चित्रपटाच्या दुसऱ्या चॅप्टरने रेकॉर्डब्रेक कमाई केली. अशा परिस्थितीत, आता चाहते चित्रपटाच्या तिसर्‍या भागाची वाट पाहत आहेत, ज्याबद्दल अनेक बातम्याही समोर आल्या आहेत. या सगळ्यांमध्ये आता बॉलिवूड इंडस्ट्रीतील प्रसिद्ध फिल्म मेकर करण जोहरने (Karan Johar) एक मुलाखत दिली आहे, ज्यामध्ये त्याने ‘केजीएफ’वर वक्तव्य केले आहे.

करण जोहर म्हणाला, “जेव्हा मी केजीएफ चॅप्टर २’चे रिव्ह्यू वाचले, तेव्हा मी विचारात पडलो. मी विचार करत होतो की, जर आपण हा चित्रपट बनवला असता तर आतापर्यंत आमचे लिंचिंग केले गेले असते. पण इथे प्रत्येकजण याच्या यशाचा आनंद साजरा करत आहे. मात्र, मला हा चित्रपट खूप आवडला हेही खरे आहे. पण तरीही मनात प्रश्न आला की, मी ते बनवलं असतं तर काय झालं असतं?” (karan johar reaction on kgf 2 success)

करण जोहरने आपल्या वक्तव्यात पुढे म्हटले आहे की, “बॉलिवुड इंडस्ट्रीतील निर्मात्यांना दक्षिण चित्रपट उद्योगातील निर्मात्यांप्रमाणे तितकी सूट मिळत नाही. दाक्षिणात्य चित्रपटांचे निर्माते या गोष्टीचा आनंद घेतात. आपण चित्रपटसृष्टीत दुहेरी अस्तित्व जगत आहोत आणि आपल्याला हे लवकरात लवकर थांबवायला हवे.”

करण जोहर त्याच्या चित्रपटांव्यतिरिक्त त्याच्या ‘कॉफी विथ करण’ या चॅट शोमुळेही चर्चेत आहे. या शोचा ७वा सीझन लवकरच सुरू होणार असून, त्याचे शूटिंग सुरू झाले आहे. काही काळापूर्वी, करणने सोशल मीडियावर काही फोटो देखील शेअर केले होते, ज्यात शोचे शूटिंग सुरू झाल्याची घोषणा केली होती.

‘केजीएफ चॅप्टर २’बद्दल बोलायचे झाले तर, हा एक कन्नड चित्रपट आहे, जो तमिळ, तेलगू, मल्याळम तसेच हिंदीमध्ये प्रदर्शित झाला होता. चित्रपटाचा पहिला भाग २०१८ साली आला होता आणि दुसरा भाग १४ एप्रिल २०२२ रोजी रिलीझ झाला होता. ज्यामध्ये कन्नड रॉकिंग स्टार यशसोबत संजय दत्त (Sanjay Dutt), रवीना टंडन (Raveena Tandon) आणि श्रीनिधी शेट्टी (Srinidhi Shetty) दिसले होते. या चित्रपटाने जगभरात १२५० कोटींची कमाई केली होती. त्याच वेळी, या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनने सुमारे ४३० कोटींची कमाई केली.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा