बॉलिवूडमधील आयकॉनिक चित्रपटांमध्ये ‘कुछ कुछ होता है’ या चित्रपटाचेही नाव घेतले जाते. या चित्रपटात शाहरुख खान, काजोल आणि राणी मुखर्जी यांनी साकारलेली अनुक्रमे राहुल, अंजली आणि टिना ही पात्र प्रचंड गाजली होती. आता या चित्रपटाचा रिमेक करायचा झाल्यास कोण ही पात्र साकारू शकतं, याबद्दल या चित्रपटाचा दिग्जर्शक करण जोहरने मत व्यक्त केले आहे.
एका मुलाखतीत करणला या चित्रपटाच्या रिमेकबद्दल विचारले असता, त्याने सांगितले की तो रणवीर सिंग, आलिया भट्ट आणि जान्हवी कपूर यांना रिमेकसाठी संधी देईल. रणवीर राहुलच्या, आलियाला अंजलीच्या आणि जान्हवीला टिनाच्या भूमिकेत चांगले वाटतील, असंही तो म्हणाला.
(ही बातमी ८० शब्दांत आहे. सविस्तर बातम्यांसाठी भेट द्या dainikbombabomb.com)