Thursday, July 31, 2025
Home बॉलीवूड करण जोहरनं ट्विटरला केलं रामराम! चाहत्यांना बसला मोठा धक्का

करण जोहरनं ट्विटरला केलं रामराम! चाहत्यांना बसला मोठा धक्का

बॉलिवूड निर्माता- दिग्दर्शक करण जोहर(Karan Johar) सोशल मीडियावरील सक्रीय सेलिब्रिटी आहे. करणने ट्विटर या सोशल मीडिया अकाऊंटबद्दल महत्तवपूर्ण निर्णय घेतला आहे. करणने ट्विटरचा निरोप घेतला आहे. यासंदर्भात त्याने स्वत: ट्विटरवर याची घोषणा केली आहे. ट्विटर अकाऊंटवरुन रामराम करण्यामागचं कारण मात्र करणने स्पष्ट केले नाही. ट्विटरवरील निगेटिव्हिटीला कंटाळून निर्माता आणि दिग्दर्शकाने हा निर्णय घेतला आहे.

‘फक्त अधिकाधिक सकारात्मक ऊर्जेसाठी जागा निर्माण करत आहे आणि त्या दिशेने उचललेलं हे महत्त्वाचं पाऊल आहे. गुडबाय ट्विटर’, असं ट्विट करणने केलं आहे. करणने हे ट्विट करताच त्यावरून विविध प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. या निर्णयामुळे एकीकडे त्याचे चाहते निराश झाले आहेत, तर काही जण त्याच्या निर्णयाचे समर्थन करत आहेत, तर अनेक जण त्याला या निर्णयावर ट्रोलही करत आहेत.

‘सोशल मीडिया प्लॅटफॉर्मपेक्षा सकारात्मक ऊर्जा आणि मानसिक शांती अधिक महत्त्वाची आहे’, अशी कमेंट एकाने केली. तर ‘कृपया तू ट्विटर सोडू नकोस’, अशी विनंती दुसऱ्या युजरने केली. काहींनी तर करणच्या या निर्णयाचा आनंद व्यक्त केला. हास्यास्पद मीम्स पोस्ट करत त्यांनी करणचे आभार मानले आहेत.

कॉफी विथ करणच्या यंदाच्या सिझनमध्ये करणने सोशल मीडियावरील ट्रोलिंग आणि नकारात्मकतेविषयी भाष्य केले होते. काही वर्षांपूर्वी अस्वस्थता आणि चिंतेचा सामना केल्याचंही करणने स्पष्ट केलं. इतकेच नव्हे तर यासाठी त्याला उपचारही घ्यावे लागले होते.

करण जोहरच्या आधी अनेक कलाकारांनी ट्विटर अकाऊंटवरून काढता पाय घेतला आहे. सततच्या ट्रोलिंगला वैतागून त्यांनी हे पाऊल उचललं होतं. करण जोहरला अनेकदा मीडियावर टीकेला सामोरे जावे लागते. काही काळापूर्वी त्याच्या पार्टीच्या व्हिडिओमुळे अनेक स्टार्स अडचणीत आले होते. काही लोक त्याला त्याच्या कामासाठी ट्रोल करतात, तर काही तिच्या वैयक्तिक आयुष्यासाठी. त्यांनी ट्विटर सोडण्याचे हेच कारण असल्याचेही त्यांच्या ट्विटवरून दिसते.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
आई-वडील होताचं नयनतारा आणि विघ्नेश अडचणीत, तमिळनाडूच्या मंत्र्यांचे निर्देश

शालिनला धक्का देणं पडलं महागात, बिग बॉसने दोन आठवड्यांसाठी दिली ‘ही’ शिक्षा

हे देखील वाचा