अभिनेत्री आलिया भट्टच्या (Alia Bhatt) प्रेग्नेंसीची गोड बातमी ऐकून बॉलिवूड चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माता करण जोहर (Karan Johar) सध्या आनंदात आहेत. करण जोहर आजोबा बनणार आहे, त्यामुळेच त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. त्याने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर आलिया आणि रणबीर कपूरच्या लग्नाचा फोटो शेअर करून आनंद व्यक्त केला आहे ज्यामधून आपला आनंद व्यक्त केला आहे.
याबाबत संपूर्ण माहिती अशी की, बॉलिवूडचे क्यूट कपल आलिया भट्ट आणि रणबीर कपूरचा विवाह सोहळा काही महिन्यांपूर्वी पार पडला होता. त्यानंतर नुकतीच आलियाने आई होणार असल्याची बातमी देऊन सर्वांनाच सुखद धक्का दिला होता. ही बातमी सध्या बॉलिवूड जगतात चर्चेत असून याबद्दल अनेकजण आलियाचे अभिनंदन करताना दिसत आहेत. सध्या आलियाची ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून चाहते कमेंट करून तिचे अभिनंदन करत आहेत.हा क्षण आलिया-रणबीरसाठी खूप खास असला तरी बॉलिवूड दिग्दर्शक करण जोहरसाठी तो खूप महत्त्वाचा आहे.
View this post on Instagram
चित्रपट निर्माता करण जोहरनेही आलिया भट्टचे अभिनंदन केले आहे. आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर आलिया-रणबीरचा फोटो शेअर करत करणने खास शब्दात अभिनंदन केले आहे. ज्यामध्ये “या दोघांसाठी खूप प्रेम, माझे बाळ आई होणार आहे. मी माझ्या भावना व्यक्त करू शकत नाही. यासाठी मी खूप आणि खूप उत्सुक आहे,” असे म्हणत करण जोहरने आपला आनंद व्यक्त केला आहे. आलिया आणि करणमध्ये भावनिक बंध आहे. आलिया करणला आपला वडिल मानते आणि त्याचा मुलगा यशला राखी बांधते. म्हणूनच आलियाची प्रेग्नेंसी हा करणसाठी भावनिक क्षणापेक्षा कमी नाही. आलियाने इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर करत ही माहिती दिली होती. ज्यावर तिच्या चाहत्यांनी प्रतिक्रिया देत आलियाचे अभिनंदन केले होते.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
- हेही वाचा-
- काळीज तोडणारी बातमी! सिद्धू मुसेवालाच्या निधनानंतर ‘या’ कलाकारानेही सोडले प्राण, मृत्यूचे कारण अस्पष्ट
- फराह खानला ६५ वर्षीय अनिल कपूरने वाटतो सर्वात तरुण अभिनेता, व्हिडिओ होतोय सोशल मीडियावर व्हायरल
- ॉदाक्षिणात्य सिनेसृष्टी शोकसागरात! लोकप्रिय अभिनेत्याची राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या