Wednesday, July 3, 2024

‘लोकं निघून जातात, पण आम्ही कुठे जिवंत आहोत’, करण जोहरच्या पोस्टने सर्वांनाच टाकले गोंधळात

करण जोहर बॉलिवूडमधील प्रसिद्ध आणि लोकप्रिय निर्माता दिग्दर्शक. अनेक हिट सिनेमे देणारा करण जोहर इंडस्ट्रीसोबतच लोकांमध्ये देखील चांगलाच लोकप्रिय आहे. सध्याचा काळ करणसाठी खूपच चांगला आहे. एकत्र त्याची निर्मिती असणारा ‘शेरशहा’ सिनेमा चांगलाच गाजत आहे, त्याने त्याचा ज्वेलरी बिजनेस देखील लाँच केला, तर दुसरीकडे त्याने नुकतीच त्याची नवी इंनिंग सुरु केली आहे. करण सध्या बिग बॉस ओटीटीचा सूत्रसंचालक म्हणून सर्वाना दिसत आहे. त्याची ही नवी भूमिका देखील प्रेक्षकांना खूप आवडत आहे.

यासर्व गोष्टींमध्ये करणने त्याच्या इन्स्टा स्टोरीमध्ये असे काही लिहिले जे वाचून सर्व जणं बुचकळ्यात पडले आहे. त्याने त्याच्या स्टोरीमध्ये लिहिले, “कोणी निघून गेले. मग नंतर तुम्ही दुःखाचे बटन दाबले. आयुष्य छोटे आहे ही गोष्ट हजारवेळा सांगायला लागले. वाद विवाद संपवण्याबद्दल देखील बोलले गेले. मग अचानक तुम्ही स्वतःबद्दल वाईट बोलणे ऐकले आणि आपणही तेच केले. पाठीमागे शिव्या देणे, वा! उत्तर लोकं निघून जातात. पण आम्ही कुठे जिवंत आहोत?” (karan johar cryptic post)

Photo Courtesy: Instagram/karanjohar

 

आता करणची ही पोस्ट पाहून सर्वांनाच प्रश्न पडला आहे की, नक्की करणला काय सांगायचे आहे. त्याच्या या पोस्टचा अर्थ कोणालाच लागत नाही. त्यामुळे सोशल मीडियावर देखील चर्चेला उधाण आले आहे. मागच्या वर्षी सुशांतसिंग राजपूतने आत्महत्या केल्यानंतर त्याच्या या आत्महत्येला करणला कुठे ना कुठे जबाबदार धरले गेले. सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणावर त्याला ट्रोल केले गेले. नेपोटीझमला करणच खतपाणी घालत असल्याचे आरोप देखील त्याच्यावर झाले. करणच आहे जो स्टार किड्सला मोठ्या प्रमाणावर सिनेमांमधून लाँच करतो. सुशांत सिंग राजपूत केसच्या तपासणीतही करणच्या धर्म प्रॉडक्शनची चौकशी झाली होती. आता करणने ही पोस्ट नक्की कोणत्या अर्थाने?, का?, कोणाला उद्देशून? लिहिले आहे हे तोच सांगू शकेल.

करण सध्या बिग बॉस ओटीटीवर सूत्रसंचालक म्हणून दिसत असून, सोबत त्याने त्याच्या आगामी दिग्दर्शकीय सिनेमा असलेल्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ चित्रपटाची शूटिंग देखील सुरु केली आहे. या सिनेमात आलिया बट्ट, रणवीर सिंग, धर्मेंद्र, जया बच्चन आणि शबाना आझमी दिसणार आहेत.

 

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अपारशक्ती खुराणा लवकरच होणार बाबा, शेअर केला पत्नीच्या डोहाळे जेवणाचा सुंदर व्हिडिओ

-‘तुम्ही मला टक लावून पाहत होता पण…’, म्हणत प्रिया बापटकडून फोटो शेअर

-बोल्ड आणि डॅशिंग! ‘दिलबर गर्ल’ नोरा फतेहीचा नवीन लूक आला समोर

 

हे देखील वाचा