चित्रपट निर्माता करण जोहर होस्ट करत असणारा ‘कॉफी विथ करण’ हा शो चाहत्यांना खूप आवडत असून नेहमीच चर्चेत असतो. याची लोकप्रियता यावरूनच कळते की, याचे ६ पर्व यापूर्वी येऊन गेले असून आता ७वे पर्व देखील आले आहे.
या शोचा पहिला भाग काही दिवसांपूर्वीच आलेला असून तो सुपरहिट देखील झाला. करण जोहरने याबद्दल आनंद व्यक्त करत काही माहिती दिली.करण जोहरने ९ जुलै २०२२ला त्याच्या इंस्टाग्रामवर ‘कॉफी विथ करण ७’ (Koffee With Karan 7)ची एक पोस्ट शेअर केली असून त्याद्वारे माहिती दिली की, ‘कॉफी विथ करण ७’ शोच्या पहिल्या भागाला सर्वाधिक हिट्स मिळाल्या आहेत.
याचबरोबर करण जोहरने कॅप्शनमध्ये लिहीले की, “जर तुम्ही अजून पण कॉफी विथ करण ७चा पहिला भाग बघितला नसेल, तर जे पण तुम्ही करत असाल ते सोडा आणि जाऊन बघा. HotstarSpecials कॉफी विथ करण ७ आता दर गुरुवारी डिस्ने प्लस हॉटस्टारवर दाखवण्यात येणार आहे.” दरम्यान कॉफी विथ करण ७’ (Koffee With Karan 7)च्या पहिल्या भागात पाहुणे म्हणून रणवीर सिंग आणि आलिया भट्ट यांनी हजेरी लावली होती.
(ही बातमी ८० शब्दांत आहे. सविस्तर बातम्यांसाठी भेट द्या dainikbombabomb.com)