Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

‘हम गिरने वालों में से नहीं’ म्हणत करण जोहरने ‘ती’ पोस्ट शेअर करत नक्की कोणावर साधला निशाणा?

बॉलिवूडमध्ये अनेक हिट सिनेमे देणारा दिग्दर्शक आणि निर्माता म्हणून करण जोहरला ओळखले जाते. करण अतिशय लोकप्रिय आणि प्रसादच आहे. त्याच्या सिनेमात काम करणे अनेक कलाकारांचे स्वप्न आहे. बॉलिवूडमधील ब्रँड म्हणून त्याला ओळखले जाते. मात्र यासोबतच त्याला सिनेसृष्टीतील नेपोटीझमचा किंग देखील म्हटले जाते. कारण त्याने बहुतकरून त्याच्या चित्रपटांमध्ये स्टार्सकिड्सला संधी दिली आहे. सोबतच तो नेपोटीझमला समर्थन देताना देखील तो दिसतो. 

करण जोहरच्या कट्टर दुष्मन म्हणून कंगना रणौतचे नाव सर्वात आधी येते. करणने ‘का’ म्हटले की तिच्याकडून ‘रे’ आलेच पाहिजे. नेहमीच कर्णवर निशाणा साधणाऱ्या कंगनाला आता त्याने देखील उत्तर देण्याचे ठरवले आहे. कारण करणने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यात तिने कोणाचे नाव घेतले नसले तरी इशारा मात्र क्विंकडेच आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Karan Johar (@karanjohar)

मागील काही दिवसांपासून करण जोहरवर प्रियांका चोप्रा आणि अनुष्का शर्मा याचे करियर संपवण्याचा मोठा आरोप केला जात आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये देखील तो अनुष्काचे करियर संपवण्याबद्दल बोलताना दिसत आहे. यानंतर त्याला मोठ्या प्रमाणावर ट्रोल करत लोकांनी अनेक प्रश्न देखील विचारले आहे. यात कंगना देखील होती. तिने एक व्हिडिओ शेअर करत लिहिले होते की, ‘बस चाचा चौधरीला हेच एक काम आहे.’ यावर विवेक अग्निहोत्री यांनी देखील त्यांचा राग दाखवला होता.

आता यावर करण जोहरने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीमधून एक पोस्ट शेअर करत उत्तर दिले आहे. त्याने तिच्या पोस्टमधून काही कवितेच्या ओली लिहिल्या आहेत. या पोस्टमध्ये त्याने लिहिले, “लावून घ्या आरोप…आम्ही माघार घेणाऱ्या लोकांसारखे नाही आहोत. खोट्याचे गुलाब जरूर व्हा…आम्ही बोलणाऱ्या लोकांसारखे नाही आहोत…आम्हला किती खालच्या पातळीचे दाखवा…कितीही आरोप लावा…आम्ही पडणाऱ्या लोकांप्रमाणे नाही…आमचे काम आमचा विजय आहे…तुम्ही काढा तलवार…आम्ही मारणाऱ्या लोकांसारखे नाही…’
(‘लगा लो इल्जाम…हम झुकने वालों में से नहीं हैं, झूठ के बन जाओ गुलाम…हम बोलने वालों में से नहीं….जितना नीचा दिखाओगे..जितने आरोप लगाओगे…हम गिरने वालों में से नहीं..हमारा करम हमारी विजय है..आप उठा लो तलवार..हम मरने वालों में से नहीं..।’ )

दरम्यान करण जोहरच्या कामाबद्दल सांगायचे झाले तर तो लवकरच ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या सिनेमातून बऱ्याच काळानंतर दिग्दर्शन करताना दिसणार आहे. यात आलिया भट्ट आणि रणवीर सिंग यांच्या मुख्य भूमिका आहेत.

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
अण्णांचा हटके अंदाज! नागराज मंजुळने वाजवली हलगी अन् आकाश-सायलीने केला भन्नाट डान्स, व्हिडिओ व्हायरल

आपल्या विवादित आणि मुक्त वक्तव्यांमुळे सतत चर्चित असणाऱ्या ‘या’ अभिनेत्रीला ओळखले का?

हे देखील वाचा