Saturday, June 29, 2024

अनुषा अन् करणचं ३ वर्षांचं गोड नातं ‘या’ कारणामुळे एका झटक्यात झालं कडू

इंडस्ट्रीतील कलाकार म्हणल्यावर त्यांना चर्चेत यायला कारण कसलं लागतंय…? कलाकारांना शिंक आली, किंवा ठसका जरी लागला तरी त्यांच्या बातम्या मीडियात वाऱ्यासारख्या पसरतात. मग विचार करा जर हेच कलाकार रिलेशनशिपमध्ये आले किंवा त्यांचं ब्रेकअप झालं, तर किती चर्चा होत असेल.? अर्थात खूपच. इंडस्ट्रीत काम करताना अभिनेता- अभिनेत्री एकमेकांना पसंत करू लागतात, हळूहळू त्यांच्यात मैत्री वाढते आणि याच मैत्रीचं पुढं प्रेमात रुपांतर होतं. काही कलाकार मंडळी त्यांचं नातं लपवून ठेवतात, तर काहीजण सर्व जगापुढं आपल्या प्रेमाची कबुली देतात. अशीच एक जोडी होती करण कुंद्रा (karan kundra) आणि अनुषा दांडेकर. (anusha dandekar) यांचंही नातं काय फार काळ लपून राहिलं नाय. पण तीन वर्षे रिलेशनशिपमध्ये असलेली ही जोडी अशी काही वेगळी झाली की आता त्यांना एकमेकांचं तोंडही बघायचं नाय. काय होतं यांच्या ब्रेकअपमागील कारण जाणून घेऊया…

२०१५ सालचा ‘लव्ह स्कूल’ हा शो आठवतोय का? दुरावलेल्या जोडप्यांना टास्क देऊन मदत करण्याचं काम या शोमध्ये होस्ट करायचे. या टास्कमध्ये हे जोडपं आपोआप एकमेकांशी जोडलं जाऊन आणि भूतकाळातील गैरसमज मागं टाकून पुन्हा एकत्र यायचे. याच शोचं होस्टिंग अनुषा अन् करण एकत्र करायचे. याच शोमधून हे जोडपं एकमेकांच्या जवळ येऊ लागलेलं. शोमधील स्पर्धकांना प्रेमाचा खरा अर्थ सांगताना हे दोघेच एकमेकांच्या प्रेमात पडले होते.

त्यांच्यातील हे नाते आता बहरायला लागलं होतं. हे जोडपं लिव्हइन रिलेशनशिपमध्येही राहू लागलं होतं. जिथं जाईल तिथं हे जोडपं एकमेकांच्या प्रेमाच्या सागरात अखंड बुडालेलंच दिसायचं. पण सगळं चांगलं सुरू असतानाच यांच्या प्रेमाच्या नात्याला खिंडार पडण्यास सुरुवात झाली. त्यांच्यातील मतभेदांमुळं त्यांचं ब्रेकअप झालं. पण ब्रेकअप जेव्हा झालं, तेव्हा अनुषानंं करणवर थेट धोका दिल्याचा आरोप लावला. अनुषानं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत लिहिलं होतं की, ‘तिच्यासोबत फसवणूक झालीय. तिच्याशी खोटं बोललं गेलंय. मी माफी मागण्याची वाट पाहत होते, पण असं कधी झालंच नाय.’

यानंतर मात्र, करणनं एका मुलाखतीत आपल्यावर लावलेले सर्व आरोप खोटे असल्याचं सांगितलं होतं. तो म्हणाला होता की, “आम्ही आमचं नातं टिकवण्याचा पूर्ण प्रयत्न केला. पण असं काही झालं नाय.”

आता या जोडप्यानं आयुष्यातीत आपापल्या वाटा शोधल्या आहेत. करण बिग बॉस १५ चा भाग असून तो तेजस्वी प्रकाशसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा आहेत. दुसरीकडं अनुषाही टीव्ही ऍक्टर जेसन शाहसोबत रिलेशनशिपमध्ये आहे.

या व्हिडिओचा शेवट करण्यापूर्वी तुम्हाला अनुषाआधी करण कुणाला डेट करायचा याचीही माहिती देऊन टाकू. अनुषाला डेट करण्यापूर्वी करण अभिनेत्री कृतिका कामरासोबत रिलेशनशिपमध्ये होता. हे दोघेही ‘कितनी मोहब्बत है’ या मालिकेत लीड रोलमध्ये होते. शोमध्ये दोघांची खूप भांडणं व्हायची. पण खऱ्या आयुष्यात हे दोघेही एकमेकांचे जिगरी दोस्त बनले होते. हळूहळू यांचं नातं प्रेमात बदलत गेलं. पण काही वर्षांनी त्यांनी ब्रेकअप केलं आणि सर्वांनाच जोराचा झटका दिला. एका शोमध्ये करणनं कृतिकाला राजीव खेंडलवालसोबत किस करताना पाहून वेडापिसा झालेला. त्यानंतर त्यांच्यात वाद सुरू झाले आणि त्यांनी ब्रेकअप केलं. आधी कृतिका आणि नंतर अनुषासोबत रिलेशनशिपमध्ये असलेल्या करणची गाडी कधी रुळावर टिकलीच नाही.

हेही वाचा-

कमाईच्या बाबतीत ‘पुष्पा’ला टक्कर देणारे टॉलिवूड सिनेमे

अय्यो! दीपिकाची इच्छा पूर्ण करणे रणवीरच्या अंगाशी; बेअर ग्रिल्स म्हणाला, ‘तू आता अंडरवेअर काढ’

अभिनेत्री कुब्रा सैतने केले मोठे वक्तव्य; म्हणाली, ‘बॉलिवूडमध्ये राक्षस भरलेले आहेत’

 

हे देखील वाचा