Wednesday, June 25, 2025
Home टेलिव्हिजन करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश यांच्या ‘रुला देती है’ गाण्याचे रोमॅंटिक पोस्टर प्रदर्शित

करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश यांच्या ‘रुला देती है’ गाण्याचे रोमॅंटिक पोस्टर प्रदर्शित

कलर्स टिव्हीवरील बिगबॉस हा कार्यक्रम प्रचंड लोकप्रिय आहे. या कार्यक्रमात मनोरंजन क्षेत्रातील अनेक दिग्गज कलाकार सहभागी होत असतात. बिग बॉस जिंकलेले कलाकार पुढे या क्षेत्रात प्रचंड यशस्वी होतात. त्याचप्रमाणे बिग बॉसच्या घरात जोड्यासुद्धा खूप तयार होतात. काही जोड्या भविष्यातही टिकतात आणि लग्नापर्यंत देखील जातात. यंदाच्या बिग बॉस १५ च्या पर्वात सर्वात जास्त चर्चा झाली ती करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाशच्या प्रेमप्रकरणाची. करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश यांची जोडी बिग बॉसच्या घरात चांगलीच प्रकाशझोतात आली. आता दोघेही घरातून बाहेर आल्यानंतर सतत मीडियाच्या कॅमेऱ्यांमध्ये कैद होत असतात. लवकरच या दोघांचे एक रोमँटिक गाणे देखील प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. सध्या या गाण्याची सर्वत्र चर्चा सुरू आहे.

Tejran
Photo Courtesy Instagramcolorstv

बिग बॉस 15 मध्ये गाजलेली जोडी म्हणून  तेजस्वी  प्रकाश आणि करण कुंद्रा यांचे नाव घेतले जाते. दोघेही बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर अनेकदा एकत्र फिरताना दिसतात. आता दोघेही ‘रुला देती है’ हे गाणे घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. यामध्ये करण आणि तेजस्वीची सुंदर केमिस्ट्री बघायला मिळणार आहे. हे गाणे खुपच रोमँटिक असून करण आणि तेजस्वीची जोडी या गाण्याचे मुख्य आकर्षण बनली आहे. या गाण्याचे पोस्टर समोर आले. या पोस्टरमध्ये करण आणि तेजस्वी यांची जोडी दिसत असून, सध्या हे पोस्टर सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर करण आणि तेजस्वीचा हा पहिलाच एकत्र प्रोजेक्ट आहे. या गाण्याबद्दल दोघेही खूप उत्सुक असून, सोबतच प्रेक्षकही खूपच उत्सुक आहेत. हे गाणे राणा सोतलने लिहले असून, यासर देसाईने ते गायले आहे. हे एक भन्नाट रोमँटिक गाणे असून या गाण्याचे संपूर्ण शूटिंग गोव्यामध्ये झाली आहे.

Photo Courtesy Instagramtejasswiprakash

या गाण्याबद्दल बोलताना तेजस्वीने सांगितले की “मी आणि करण दोघेही एकत्र काम करण्याची संधी शोधत होतो. आता या गाण्यातून आम्ही प्रेक्षकांच्या भेटीला येत असल्याने याबद्दल मी खूप आनंदी आहे. हे एक सुंदर हृदयस्पर्शी गाणे असून, मला हे गाणे खूप आवडले आणि ते प्रेक्षकांना देखील नक्की आवडेल.” त्यासोबतच अभिनेता करण कुंद्रा देखील या गाण्याबद्दल खूप उत्साही आहे. तेजस्वी सोबत हे त्याचे पहिलेच गाणे आहे. त्यामुळे तो देखील खूप आनंदी असल्याचे त्याने यावेळी सांगितले.

हेही पाहा – 

सखी गोखले रोज मारते तिच्या शाळेला फेरफटका, स्वतःच केला खुलासा

केवळ ४८ तासांत पन्नास हजारांहून अधिक लोकांनी युक्रेनला ठोकला रामराम, अँजेलिना जोलीने शेअर केला व्हिडिओ

माधुरी दीक्षितच्या ‘चोली के पीछे क्या है’ गाण्यावर भोजपुरी अभिनेत्री निधी झाने धरला ठेका

हे देखील वाचा