Saturday, June 29, 2024

बिग बॉस ओटीटी: कोण आहे ‘हा’ अभिनेता? जो एकच हिट चित्रपट देऊन झाला होता बॉलिवूडमधून गायब

‘बिग बॉस’ शोचे नवीन पर्व रविवारी (८ ऑगस्ट) सुरू झाले. करण जोहर होस्ट करत असलेला बिग बॉस ओटीटीवर ऑनलाईन स्ट्रीम होत आहे.  ओटीटीवर २४*७ हा शो तुम्ही पाहू शकता, तर सोमवार ते शनिवार संध्याकाळी ७ वाजता एक तासाचा भाग तुम्हीला पाहायला मिळणार आहे. परंतु दुसरीकडे दर रविवारी रात्री ८ वाजता तुम्ही हा शो पाहू शकता, ज्यामध्ये करण जोहर  असेल.

जेव्हापासून ‘बिग बॉस’ या विवादित शोचे नवीन पर्व ओटीटीवर सुरु होणार असल्याचे जाहीर झाले आहे, तेव्हापासूनच या शोबद्दल प्रेक्षकांच्या मनात खूपच उत्सुकता निर्माण झाली आहे.

या शोमधील निश्चित स्पर्धकांमध्ये राकेश बापट, झीशान खान, मिलिंद गाबा, निशांत भट्ट, प्रतीक सहजपाल, करण नाथ, शमिता शेट्टी, उर्फी जावेद, नेहा भसीन, मूस जटाना, अक्षरा सिंग, दिव्या अग्रवाल आणि रिद्धिमा पंडित यांचा समावेश आहे. या शोमधील करण नाथ तुम्हाला माहीत आहे का? त्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत.

कोण आहे करण नाथ?
‘ये दिल आशिकाना’ या चित्रपटात मुख्य भूमिका अभिनेता करण नाथ याने साकारली होती. हा चित्रपट २००२ मध्ये रिलीज झाला होता. करण नाथ पहिल्या चित्रपटापासून तो सुपरहिट ठरला होता. पण नंतरच्या काळात त्याचे चित्रपट चालले नाहीत. या चित्रपटातील ‘उठा ले जाऊंगा’ आणि ‘ये दिल आशिकाना’ ही गाणी प्रचंड हिट झाली. करण नाथ हा माधुरी दीक्षितचे मॅनेजर राकेश नाथ यांचा मुलगा आहे.

मात्र, ‘ये दिल आशिकाना’ हा चित्रपट हिट झाल्यानंतर करण नाथच्या कारकीर्दला नव्याने सुरुवात होत असतानाच ती सतत ढासळत राहिली. एकामागून एक, करणचे सर्व आगामी चित्रपट फ्लॉप होत गेले आणि त्याचप्रकारे करण देखील फ्लॉप कलाकारांच्या यादीत सामील झाला. करण नाथने ‘पागलपन’, ‘एलओसी कारगिल’, ‘तुम’, ‘तेरा क्या होगा जॉनी’ अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केले पण ते सगळेच फ्लॉप ठरले.

करण नाथ चित्रपटसृष्टीत प्रचंड अपयशामुळे नैराश्यात राहू लागला. ‘पागलपन’ हा चित्रपट प्रदर्शित झाला, तेव्हाही गोष्ट घडली. यामुळे करण डिप्रेशनमध्ये गेला. मात्र, नंतर करणने स्वतःची काळजी घेतली. तो सुमारे आठ वर्षे बेरोजगार राहिला आणि त्याला कोणताही चित्रपट मिळाला नाही. त्यानंतर जवळपास १० वर्षांनंतर पुन्हा एकदा करणने पुनरागमन केले. दरम्यान, २०२० मधील ‘गन्स ऑफ बनारस’ या चित्रपटामुळे सुपरहिट  झाला.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-इंडियन आयडलच्या ‘या’ स्पर्धकाचे फळफळले नशीब, करण जोहरकडून मिळाली थेट ‘धर्मा’साठी गाणी गाण्याची संधी

-अफेअरच्या चर्चांमध्ये सिद्धार्थ मल्होत्राने कियाराला रस्त्यावरच घेतले उचलुन, पुढे जे झाले…

-रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर घरी बेडरेस्टवर आहे नुसरत भरुचा; ‘या’ कारणामुळे अचानक बिघडली होती तब्येत

हे देखील वाचा