करीना कपूर खान (Kareena Kapoor Khan) ही बॉलिवूडमधील सर्वात यशस्वी आणि प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. करिनाने तिच्या करिअरमध्ये अनेक सुपरहिट सिनेमे दिले. करीना कपूरने २०२१ मध्ये तिच्या दुसऱ्या मुलाला जन्म दिला त्यानंतर करीना चित्रपटांपासून लांब आहे. ती तिच्या प्रेग्नसीच्या काळातही आमिर खानच्या लाल सिंग चड्ढा या सिनेमाचे शूटिंग करत होती. त्यानंतर तिची डिलिव्हरी झाली आणि तिने काही काळ तिने चित्रपटांपासून ब्रेक घेतला.
मात्र आता जवळपास एक वर्षानंतर करिनाने तिचा पुढचा सिनेमा साईन केल्याची माहिती मिळत आहे. करिनाने दिग्दर्शक सुजॉय घोष (Sujoy Ghosh) च्या आगामी क्राईम सस्पेन्स थ्रिलर सिनेमात दिसणार असल्याचे बोलणे जात आहे. जर सर्व काही योग्य झाले तर सुजॉय घोषच्या आगामी सिनेमात करीना कपूर मुख्य भूमिका साकारताना दिसेल आणि या सिनेमाचे शूटिंग पुढच्या महिन्यापासून सुरु देखील होईल. या सिनेमाच्या निमित्ताने करीना बऱ्याच काळाने चित्रपटांमध्ये परतणार आहे.
एका रिपोर्टनुसार या सिनेमावर मागील बऱ्याच वर्षांपासून काम चालू होते हे काम आता पूर्ण झाले असून, सुजॉय हा सिनेमा बनवण्यासाठी सज्ज झाला आहे. हा सिनेमा सुजॉय ‘डिवोशन ऑफ सस्पेक्ट एक्स’ या कादंबरीवर बनवत आहे. या सिनेमात सुजॉयला आधीपासूनच करीनच मुख्य भूमिके पाहिजे होती. तर सैफ अली खानला देखील घेण्याची त्याची इच्छा होती, मात्र आता करिनासोबत हा सिनेमा पुढे जाणार आहे. प्राप्त माहितीनुसार करिनाने चित्रपटाच्या तयारीसाठी आणि तिच्या लूकबाबत चर्चा करण्यासाठी अनेकदा सुजॉयची भेट घेतली. लवकरच मेकर्स आणि कलाकार त्यांचे वर्कशॉप सुरु करणार आहेत. सगळे ठरवल्याप्रमाणे झाले तर मार्चमध्ये टीम पश्चिम बंगालच्या एका हिल स्टेशनवर जात चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करतील. तयार मग तयार राहा बेबोला अजून एका नवीन आणि हटके भूमिकेत बघण्यासाठी.
हेही वाचा :










