Wednesday, June 26, 2024

अबब! तब्बल ‘इतक्या’ किंमतीचे मास्क वापरते ‘बेबो’, वाचा तिच्या एका मास्कची किंमत

मुंबईत कोरोना विषाणूच्या प्रकरणांची आकडेवारी ही गगनाला भिडत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये रणबीर कपूर, आलिया भट्ट, परेश रावल, विकी कौशल, गोविंदा, भूमी पेडणेकर आणि अक्षय कुमार यांच्यासह अनेक कलाकार कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. अशा परिस्थितीत कोव्हिड-19 च्या नियमांचे योग्य पालन करावे, अशी विनंती कलाकार चाहत्यांना करत आहेत. नुकतीच अभिनेत्री करीना कपूर खाननेही चाहत्यांना आवाहन केले आहे. पण या दरम्यान तिच्या मास्कने सर्वांचे लक्ष वेधले आहे. ज्याची किंमत खरोखरच थक्क करणारी आहे.

सोशल मीडियावर खूप सक्रिय असणारी करीना कपूर खान, तिच्या चाहत्यांना वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्याबद्दल अपडेट देत असते. अभिनेत्रीने नुकताच मास्क घातलेला स्वत: चा एक फोटो शेअर केला आहे. फोटोत करीनाने काळ्या रंगाचे मास्क परिधान केले होते आणि चाहत्यांनी मास्क लावायला हवे, असे आवाहन केले होते. यासह तिने कॅप्शनमध्ये लिहिले की, “हा प्रोपगंडा नाही. कृपया आपले मास्क लावावे.”

विशेष म्हणजे, करीना कपूरने फोटोत लावलेला काळ्या रंगाचा मास्क इतका स्वस्त नाही. मास्कवर पांढर्‍या रंगाचे एलव्ही (LV) चिन्ह देखील आहे. हा मास्क एका रेशीम पाऊचसोबत मिळतो. तुम्ही या ब्रँडच्या वेबसाईटवर गेल्यास, तुम्हाला या मास्कची किंमत $355 डॉलर्स असल्याचे दिसेल. भारतीय चलनात या मास्कची किंमत सुमारे 25,994 रुपये आहे.

हे 2021 वर्ष करीना कपूरसाठी खूप खास ठरले. 21 फेब्रुवारी, 2021 रोजी तिने दुसर्‍या मुलाला जन्म दिला. अभिनेत्री तिच्या नव्याने जन्माला आलेल्या मुलाची चांगलीच काळजी घेत आहे आणि त्याच्यासोबत वेळही घालवत आहे. बेबोच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर ती आमिर खानचा सर्वात मोठा प्रोजेक्ट ‘लालसिंग चड्ढा’ मध्ये दिसणार आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख 25 डिसेंबर, 2021 सांगण्यात आली आहे. तसेच, तिचे चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अरुणाचल प्रदेशातील आगीत नुकसान झालेल्या लोकांसाठी धावून आले वरुण- नताशा, केली ‘इतक्या’ लाख रुपयांची मदत

-अभिनेत्री बनण्याचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या तरुणींना राणीचा ‘गुरुमंत्र’, म्हणाली ‘…तर तुम्ही खुशाल या’

-‘इंडियन आयडल १२’ चा भाग बनल्यामुळे गायिकेने साधला ‘सदाबहार’ अभिनेत्री रेखावर निशाना, तर अनु मलिकला म्हटले क्रूर

हे देखील वाचा