Tuesday, April 8, 2025
Home बॉलीवूड करीना कपूर खानला सरोगसीद्वारे हवं होत मुल, पती सैफने उघड केलं प्रेग्नेंसीपूर्वीचं ‘ते’ रहस्य

करीना कपूर खानला सरोगसीद्वारे हवं होत मुल, पती सैफने उघड केलं प्रेग्नेंसीपूर्वीचं ‘ते’ रहस्य

अभिनेत्री  करीना कपूर खान आणि सैफ अली खान त्यांच्या चित्रपटांसह, त्यांच्या मुलांमुळे अनेकदा चर्चेत येतात. बेबोने अलीकडेच ‘प्रेग्नन्सी बायबल’ हे पुस्तक लॉंच केले आहे. ज्यात तिने तिच्या प्रेग्नन्सीमधील दिवसांबद्दल अनेक रहस्ये उघड केली आहेत. या पुस्तकात तिचा छोटा मुलगा जहांगीरच्या नावाचाही उल्लेख केला आहे. तेव्हापासून  सोशल मीडीयावर चाहत्यांची चर्चा सुरु झाला आहे. आई होण्यापूर्वी प्रत्येक मुलीप्रमाणे करीनालाही भीती वाटत होती की, गरोदरपणानंतर तिचे फिगर बदलेल. त्याचा परिणाम तिच्या कारकीर्दीवर होऊ शकतो. बॉलिवूडमध्ये पुरुषांपेक्षा महिलांसाठी बरीच आव्हाने आहेत, हे सैफ अली खानने नुकतेच स्पष्ट केले आहे.

सर्व सामान्य मुलगी असो किंवा सेलिब्रिटी असो, आई होणे कोणात्याही स्त्रीसाठी सोपे नाही. करीना कपूर खानलाही त्या दिवसात काळजी वाटत होती की, सर्वसामान्य मुलींप्रमाणेच लग्न आणि नंतर प्रेग्नेंसीमुळे तिच्या शरीरात बदल होऊ शकतात. सैफ अली खानने सांगितले की, कशाप्रकारे स्त्रियांना लग्न आणि कुटुंब नियोजनाबाबत कठोर निर्णय घ्यावे लागतात, कारण ते पूर्णपणे त्यांच्या कारकिर्दीशी जोडलेले असतात.

प्रेग्नेंसी दरम्यान करीना फिटनेसचा विचार करत होती. सैफ म्हणाला, “करीनाने फिटनेसचा विचार करुन तेव्हा डायटिंग करण्यास सुरुवात केली होती. तेव्हा ती झिरो फिगर होती आणि ती चित्रपटसृष्टीत उत्तम प्रकारचे कामही करत होती. पण त्या काळात करीनाने पुढील भविष्याचा विचार केला नसता, तर त्याचा परिणाम करीनाच्या करियरवर झाला असता.

सैफ पुढे म्हणाला, “जेव्हा मी तिच्याशी पहिल्यांदा मुलांबद्दल बोललो तेव्हा तिला थोडे आश्चर्य वाटले आणि ती म्हणाली की, ती कदाचित सरोगसीकडे वळेल. पण मग तिच्या लक्षात आलं की, आयुष्यातल्या प्रत्येक गोष्टीसाठी १०० टक्के देणं गरजेचं आहे आणि तेव्हा करीनाने मनाची तयार केली.”

दरम्यान, करीना आणि सैफ अली खान लग्नाअगोदर बऱ्याच काळ एकमेकांना डेट करत होते. त्यानंतर १६ आक्टोबर २०१२रोजी हे दोघे विवाह बंधनात अडकले. लग्नाला चार वर्षे पुर्ण झाल्यावर करीनाने तिचा मोठा मुलगा तैमूरला जन्म दिला. तर नुकतेच या वर्षी फेब्रुवारीमध्ये तिने तिच्या लहान मुलाला जन्म दिला आहे

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-Shershaah: ‘आम्हाला माधुरी दीक्षित द्या आम्ही निघून जातो’; पाकिस्तानींच्या या मागणीवर विक्रम बत्रा यांनी दिले होते भन्नाट उत्तर

-भुज: द प्राईड ऑफ इंडिया: अजय देवगणला मोठा झटका, चित्रपट झाला ऑनलाईन लीक

-कोण आहेत शहिद कॅप्टन विक्रम बात्रांच्या प्रेयसी डिंपल, का आहेत आजही अविवाहीत?

हे देखील वाचा