Wednesday, June 26, 2024

प्रसूतीच्या एका महिन्यानंतरच कामावर परतली ‘बेबो!’ ‘पैशांसाठी हे काहीही करतील’ म्हणत नेटकऱ्यांनी केले ट्रोल

बॉलिवूडची ‘बेबो’ आणि पटौदी कुटुंबाची सून करीना कपूर खान पुन्हा एकदा टशनमध्ये दिसली. ती दुसऱ्यांदा आई झाल्यानंतर पुन्हा कामावर परतली आहे. 21 फेब्रुवारीला तिने दुसर्‍या मुलाला जन्म दिला, त्यानंतर ती घरी विश्रांती घेत होती. तथापि, प्रसूतीपूर्वीही करीनाने कामापासून ब्रेक घेतला नव्हती. ती तिच्या शूटचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असायची. तसेच चाहतेही तिची अपडेट जाणून घेण्यासाठी उत्सुक असतात. करीनाच्या प्रसूतीच्या आधीच्या प्रत्येक फोटोने नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले होते.

आता जेव्हा बेबो पुन्हा एकदा कामावर परतत आहे, तेव्हा सर्वत्र तिची चर्चा होत आहे. मीडियाचे कॅमेरेही तिच्याकडेच लागलेले आहेत. वास्तविक, करीना नुकतीच शूटमधून बाहेर पडताना दिसली. या वेळी तिचा फ्रेश लूक आणि स्टाईल पाहण्यासारखी होती. गर्भधारणेच्या वेळी चेहऱ्यावर आलेली चमक अजूनही अबाधितच होती.

करीनाच्या या फोटोंनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. यासह, तिने दाखवून दिले आहे की, ती पुन्हा तिच्या स्टाईलमध्ये परतली आहे. बेबोचा हा समर लूक चाहत्यांना खूप आवडला आहे आणि तिचे जोरदार कौतुकही होत आहे. तिच्या चाहत्यांनी या फोटोंवर लाईक्स व कमेंटचा वर्षाव केला आहे.

करीनाच्या एका चाहत्याने ‘अ‍ॅक्शनमध्ये क्वीन परतली’ असे लिहिले. दुसर्‍या एका चाहत्याने लिहिले की, ‘अरे देवा, तिचे सौंदर्य एकदा पाहा आणि अल्पावधीत तिने किती वजन कमी केले आहे. महान कामगिरी माझी राणी! ती किती मेहनती स्त्री आहे. छान केले!’ या व्यतिरिक्त दुसर्‍या युजरने हेटर्सला प्रत्युत्तर देत प्रतिक्रिया व्यक्त केली की, ‘मला तिच्याबद्दल द्वेष पसरवणाऱ्या लोकांना असे म्हणायचे आहे की, जर तुम्ही कोणावर प्रेम करू शकत नाही, तर त्यांना कोणत्याही प्रकारे नावे ठेवण्याचा अधिकार तुम्हाला नाही.’

काही लोक इतक्या लवकर पुन्हा कमबॅक केल्यामुळे करीनाला टोमणे मारत आहेत. कोणी तिला म्हटले की, ‘तिला ममतेच्या प्रेमाने भरलेला अनमोल वेळ जगायचा नाही’, तर कोणी म्हटले की, ‘हे लोक पैशासाठी काहीही करतील.’ अशा बऱ्याच कमेंट्स तिच्या फोटोवर पाहिल्या गेल्या. पण असे असूनही करीनाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आणि ट्रोलर्सला चांगलेच उत्तर दिले.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा- 

-विष्णू विशाल आणि ज्वाला गुट्टा चढणार लग्नाच्या बोहल्यावर? अभिनेत्याने केली मोठी घोषणा

-‘या’ अभिनेत्याचे ट्रान्स्फॉर्मेशन पाहून तुम्ही व्हाल थक्क, केले तब्बल १८ किलो वजन कमी

-नादच खुळा! यूट्यूबवर १०० कोटी व्ह्यूजचा टप्पा पार करणारी पहिली युवा गायिका; ‘या’ दोन गाण्यांनी बनवला विक्रम

हे देखील वाचा