बॉलिवूडची ‘बेबो’ म्हणजेच अभिनेत्री करीना कपूर खानने आपल्या अभिनयाने सर्वांनाचं वेड लावलं आहे. तिने आपल्या अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे आणि ते वर्षानुवर्ष टिकवून ठेवले आहे. त्यानंतर तिने सैफ अली खानसोबत लग्न केले. तिला सध्या दोन मुलंही आहेत. करीना त्या अभिनेत्रींपैकी एक आहे, ज्यांनी तिच्या गर्भधारणेदरम्यान ब्रेक घेतला नाही. मोठा मुलगा तैमूर अली खान आणि धाकटा मुलगा जहांगीर म्हणजेच जेह यांच्या जन्मापूर्वी ती गरोदरपणाच्या शेवटच्या दिवसांपर्यंत आपल्या कामात व्यस्त होती. करीनाने तिच्या गर्भधारणेदरम्यान आलेल्या अडचणींविषयी अनेक वेळा वक्तव्य केले आहे. यावर्षी फेब्रुवारीमध्ये करीना दुसऱ्यांदा आई बनली. अलीकडेच तिने सांगितले की, मोठा मुलगा तैमूरचे त्याच्या लहान भावाशी कसे नाते आहे.
करीनाने सांगितले की, तिचा मोठा मुलगा तैमूर अली खान जेव्हा त्याचा लहान भाऊ जेहला भेटला, तेव्हा त्याची प्रतिक्रिया कशी होती. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखती दरम्यान तिने सांगितले की, “सैफ आणि मी सुरुवातीला चिंतेत होतो की, तैमूर बाळ जेहचा थोडासा हेवा करेल. जसे इतर मुलांना वाटते, पण तैमूरने तसे अजिबात केले नाही. घरात नवीन बाळ आल्यानंतर तो खूप आनंदी झाला. तैमूर मोठ्या भावाचे कर्तव्य पार पाडतो आणि जेहची जबाबदारीने काळजी घेतो आहे.”
त्याचबरोबर करीना पुढे म्हणाली की, “जेव्हा जेव्हा माझे एक किंवा दोन मित्र घरी येतात, तेव्हा तैमूर त्यांना म्हणतो की, तुम्ही माझ्या लहान भाऊ जेहला पाहिले आहे का? तुम्ही त्याला हॅलो केले आहे का?” त्याचबरोबर ती पुढे म्हणाली की, “जेव्हा मी आणि सैफ तैमूरला छेडतो की तो त्याच्या भावाशिवाय सुट्टीवर जाणार आहे, तेव्हा तो स्पष्टपणे नकार देतो आणि म्हणतो, ‘नाही, जेहशिवाय नाही जाणार.’”
करीनाने सांगितले की, तिला तिच्या दोन मुलांना कसे वाढवायचे आहे? करीनाने खुलासा केला होता की, “मला माझी दोन्ही मुलं पूर्णपणे सज्जन व्हावेत, लोकांनी असे म्हणावे की, त्यांच्यावर चांगले संस्कार झाले आहेत. दयाळू आहेत आणि मला वाटते की, माझे काम महान आहे.”
काही दिवसांपूर्वी सैफ अली खानचा वाढदिवस होता, जो त्याने मालदीवमध्ये संपूर्ण कुटुंबासह साजरा केला होता. मालदीवच्या सुट्टीतील कौटुंबिक फोटो शेअर करताना करीनाने पती सैफ अली खानला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-हम साथ साथ है! रिया कपूरच्या लग्नानंतर पुन्हा एकत्र आले ‘कपूर खानदान’, सोनम कपूरने केले फोटो शेअर
-व्हिडिओ: राज कुंद्राच्या अटकेनंतर शिल्पा शेट्टी पहिल्यांदाच दिसली सेटवर; चेहऱ्यावर होती उदासी
-‘बेलबॉटम’ रिलीझ होण्यापूर्वीच अक्षय कुमार पोहोचला लंडनमध्ये; ‘खिलाडी’ने घेतलीय मोठी रिस्क?