बाॅलिवूडमध्ये अनेक स्टारकिड्स सतत लाइमलाईटमध्ये असतात. त्यातील सर्वात लोकप्रिय स्टारकिड म्हणजे सैफ अली खान आणि करीना कपूर यांचा मुलगा तैमूर आली खान. तैमूरची लोकप्रियता खूप आहे. सोशल मीडियावर त्याचे फोटो, व्हिडिओ वेगाने व्हायरल होत असतात. अगदी जन्माला आल्यापासून त्याला मिळणारी लोकप्रियता एखाद्या मोठ्या कलाकाराइतकी आहे. त्याच्यावर सतत मीडियाचे कॅमेरे रोखलेले असतात. तैमूरच्या विविध हरकती कॅमेऱ्यांमध्ये कैद होऊन तो लगेच ट्रेंडिंग मध्ये येतो. तैमूर त्याच्या हटके स्टाईलने चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असतो.
अभिनेत्री करीना कपूरने नुकतीच इंस्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आहे. या स्टोरीमध्ये तैमूर खान आणि इब्राहिम खानने सेम सेम टॅटू काढला आहे. हे दोघे सोहा अली खानच्या मुलीच्या इनाया खेमूच्या चौथ्या वाढदिवसाचे सेलिब्रेशन करत आहे. करीनाने बर्थडे सेलिब्रेशनमधील हा फोटो इंस्टाग्राम स्टोरीवर ठेवला. फोटोमध्ये दोघेही प्लास्टिकच्या खुर्चीवर बसलेले दिसत असून, दोघेही आपला टॅटू दाखवत आहेत. फोटोमधील तैमूरच्या झक्कास लुकने चाहत्यांचे लक्ष वेधले आहे.
करीनाने सोशल मीडियावर फोटो अपलोड करताना लिहिले की, “मोठा भाऊ हाच असा एक व्यक्ती आहे. ज्याच्यासोबत मी मॅचींग टॅटू काढू शकतो.” सैफला चार मुलं आहेत. सारा अली खान, इब्राहिम अली खान, तैमूर अली खान आणि जहांगीर अली खान. सैफची दोन लग्न झाली असून, त्याचे पहिले लग्न अमृता सिंग सोबत झाले होते. त्याला आणि अमृताला सारा आणि इब्राहिम ही दोन मुले आहेत, तर दुसरी पत्नी असलेल्या करीनापासून त्याला तैमूर आणि जेह ही दोन मुले आहेत.
इनायाच्या बर्थडे पार्टीमध्ये सारा अली खान अनुपस्थित होती. त्याच वेळी जेह तैमूर आणि इब्राहिम हे तिघे विनयाचा वाढदिवसाच्या पार्टीत उपस्थित होते. दरम्यान जेहचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेले आहेत. जेह करीनाच्या मांडीवर झोपलेला दिसला. पार्टीसाठी करीनाने फ्लॉवर प्रिंट असलेला कुर्ता परिधान केला होता. बर्थडे पार्टीसाठी तैमूरने डेनिम शर्ट आणि निळ्या रंगाची पॅन्ट परिधान केली होती.
या पार्टीत सोहाची बेस्ट फ्रेंड नेहा धुपिया आपल्या मुलीला घेऊन आलेली दिसली. नेहा दुसऱ्यांदा प्रेग्नेंट आहे. तसेच पार्टी दरम्यान नेहाने फोटोसाठी अनेक पोझ दिल्या. करीनानेदेखील इनायाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना एक ब्लॅक अँड व्हाईट फोटो पोस्ट करत ‘हॅप्पी बर्थडे प्रिन्सेस’ लिहिले.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
–‘असं रूप आणि शृंगार असल्यास कोणासही येड लागेल’, म्हणत चाहत्यांनी केले अक्षयाच्या सौंदर्याचे कौतुक