Saturday, June 29, 2024

ज्याच्या गोंडसपणावर फिदा होते चाहते, त्याच तैमुरवर संतापले नेटकरी; काय आहे प्रकरण?

अभिनेत्री करीना कपूर सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने सोशल मीडियावर चर्चेत असते. कधी कपड्यांमुळे तर कधी व्हायरल व्हिडिओमुळे करीना कपूरची माध्यमांत चर्चा होत असते. कधीकधी तर तिला नेटकऱ्यांच्या टीकेला ही सामोरे जावे लागते. यावेळी ही करीना कपूरच्या व्हायरल व्हिडिओवर नेटकऱ्यांनी निशाणा साधला आहे. मात्र याचे मूळ कारण करीना कपूर नसून तिचा मुलगा तैमुर आहे, काय आहे हा सगळा प्रकार चला जाणून घेऊ.

अभिनेत्री करीना कपूर (kareena kapoor) आणि सैफ अली खान (Saif Ali Khan) यांचा मुलगा तैमुर (Taimur ali khan) सोशल मीडियावर नेहमीच लक्ष वेधत असतो. आई करीना कपूरसोबत त्याचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे ज्यामुळे तो नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आला आहे. या व्हिडिओमध्ये करीना कपूर तैमुरसोबत आपली बहीण करिश्मा कपूरच्या (Karishma Kapoor) घरी जाताना दिसत आहे.

नेहमीप्रमाणे करीना कपूरने आपल्या ड्रेसने सगळ्यांचे लक्ष वेधले होते. मात्र सगळ्यात जास्त चर्चा झाली ती तैमुरच्या रागाची. ब्लॅक टी शर्ट आणि जीन्स घातलेला तैमुर खूपच गोड दिसत होता. घरातून बाहेर पडल्यानंतर तो त्याला सांभाळणाऱ्या आयासोबत चालताना दिसतो. मात्र आयाने त्याचा हात पकडताच तो हात हिसकावून “मला पकडू नकोस” असे सांगतो. शेवटी तो हळू हळू आयासोबत चालायला लागतो. या व्हिडिओवर चाहत्यांनी प्रतिक्रिया देताना आयासोबत तैमुरच्या वागण्यावर नाराजी व्यक्त केली आहे.

मात्र अभिनेत्री करीना कपूरने आपल्या सुंदर लूकने चाहत्यांची मने जिंकली आहेत. तिने हिरव्या रंगाचा टॉप घातला होता तर खाली जीन्स घातली होती. यामधील तिच्या मनमोहक सौंदर्यावर चाहते फिदा झालेले पाहायला मिळाले. याबरोबरच तिने घातलेला गॉगल तिच्या सौंदर्यात आणखी भर टाकत होता. काही दिवसांपूर्वी करीना कपूर एका पार्टीत दिसली होती. यावेळी ही तिने घातलेल्या ड्रेसचे जोरदार कौतुक करण्यात आले होते.

हेही वाचा –

हे देखील वाचा