Friday, November 22, 2024
Home बॉलीवूड ‘बेबो’ करीना कपूरने मुलगा जेहचा थ्रोबॅक फोटो केला शेअर; तिच्या कॅप्शनने वेधले नेटकऱ्यांचे लक्ष

‘बेबो’ करीना कपूरने मुलगा जेहचा थ्रोबॅक फोटो केला शेअर; तिच्या कॅप्शनने वेधले नेटकऱ्यांचे लक्ष

हिंदी चित्रपटसृष्टीतील शानदार अभिनेत्री करीना कपूरला ‘बेबो’ म्हणूनही ओळखले जाते. करीना आता दोन मुलांची आई बनली आहे. करीनाच्या मोठ्या मुलाचे नाव तैमूर अली खान आहे, आणि तिच्या दुसऱ्या मुलाचे नाव जहांगीर अली खान उर्फ ​​जेह आहे. जहांगीर त्याच्या जन्मापासूनच चर्चेत आहे. जहांगीरला लाडाने ‘जेह’ असेही म्हणतात. करीनाने २१ फेब्रुवारी, २०२१ रोजी जेहला जन्म दिला होता. त्यावेळीच करीनाने ठरवले होते की, ती आपल्या मुलाला जेहला मीडियाच्या प्रसिद्धीपासून दूर ठेवेल, जे चाहत्यांनी अनेक वेळा पाहिले आहे. मात्र, हे देखील सत्य आहे की, या निर्णयाच्या दरम्यान, करीना स्वत: अनेकदा तिच्या मुलाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करते. अलीकडेच, करीना कपूरने तिचा मुलगा जेहचा एक थ्रोबॅक फोटो शेअर केला आहे, ज्यात करीना कपूर जेहचा चेहरा लपवते.

करीनाने ५ ऑक्टोबर रोजी अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर जेहचा थ्रोबॅक फोटो शेअर केला आहे. या फोटोत, करीनाचा मुलगा जेह पाळण्यामध्ये आरामात झोपलेला दिसतोय. या दरम्यान, जेहने टी-शर्ट आणि शॉट्स घातले आहेत. मात्र, करीनाने या फोटोमध्येही आपल्या मुलाचा चेहरा लपवला आहे. जेहच्या चेहऱ्याचा फक्त अर्धा भाग दिसत आहे, हे फोटोमध्ये पाहिले जाऊ शकते. (kareena kapoor shared photo of her son jeh say my life)

हा फोटो शेअर करत करीना कपूरने एक अतिशय गोंडस कॅप्शन दिले आहे. तिचा मुलगा जेहवर भरपूर प्रेम व्यक्त करताना करीनाने लिहिले की, “माझे आयुष्य, तुझे गाल आणि लाड- प्रेम मला पूर्ण करते.” यासोबतच करीनाने दोन हार्ट इमोजीचाही समावेश केला आहे.

यापूर्वी करीनाने तिच्या मालदीवच्या सुट्टीत मुलगा जेहचा एक फोटो शेअर केला होता. या फोटोद्वारे करीनाने सांगितले होते की, तिचा मुलगा जेह सहा महिन्यांचा झाला आहे. फोटोमध्ये करीना आपल्या मुलाचा हात हातात धरताना दिसत होती, आणि ती प्रेमाने आपल्या मुलाच्या डोक्याचे चुंबन घेताना दिसली होती. त्याच वेळी, जेहचा चेहरा या प्रसंगी दुसऱ्या बाजूला होता. हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता.

करीना कपूर आणि सैफ अली खान यांना त्यांच्या मुलाचे नाव जहांगीर ठेवण्यावरून ट्रोल केले गेले होते. यावर प्रत्युत्तर देताना करीनाने तिच्या एका मुलाखतीत सांगितले की, “मी एक सकारात्मक व्यक्ती आहे. मी ट्रोलर्सबद्दल विचार करत नाही. मी आनंदी आणि समाधानी आहे.” करीनाने असेही म्हटले होते की, तिने काही विचार करून तिच्या दुसऱ्या मुलाचे नाव जहांगीर ठेवले नाही. हे नाव तिला आणि तिच्या कुटुंबाला आवडले, म्हणून तिने जहांगीर असे दुसऱ्या मुलाचे नाव ठेवले.

याआधीही तैमुरचे नाव ठेवण्यावरून तसेच प्रेग्नंसी बायबलवरून देखील अभिनेत्री करीना कपूर खान ट्रोल झाली होती.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-उर्वशी रौतेलाच्या हवेत उडणाऱ्या केसांनी चाहत्यांना केले घायाळ; अदा पाहून नेटकरी म्हणाले, ‘उफ्फ!’

-एनसीबी शाहरुख खानला लक्ष्य करतेय? लावलेल्या आरोपांवर झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी तोडले मौन

-‘तिचं नाव सुद्धा आठवत नाहीये…’, रणवीर सिंगच्या गर्लफ्रेंडबद्दलच्या ‘या’ प्रश्नावर सलमान खानचं तडकीफड उत्तर

author avatar
Tejswini Patil

हे देखील वाचा