Thursday, April 24, 2025
Home बॉलीवूड सतत बदलणाऱ्या मूडमध्ये ‘हा’ आहे बेबोचा ‘फॉरएव्हर मूड’; पोस्ट शेअर करून दिली माहिती

सतत बदलणाऱ्या मूडमध्ये ‘हा’ आहे बेबोचा ‘फॉरएव्हर मूड’; पोस्ट शेअर करून दिली माहिती

बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान ही सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. त्याचबरोबर ती सध्या आपल्या कुटुंबासोबत ती वेळ घालवत आहे. करीना ही पती सैफ अली खान, मुलगा तैमूर आणि जहांगीर यांच्यासोबत सुट्टीचा आनंद घेत आहे. खान परिवार सध्या समुद्र किनारी एन्जॉय करताना दिसत आहे.

नुकतेच करीनाने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर अनेक फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती तिचे वेगवेगळे मूडचे दाखवताना दिसली आहे. त्यामधील एक फोटो तिचा लहान मुलगा जहांगीरचा आहे. या फोटोमध्ये जहांगीर खेळणी पकडण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. हा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. (kareena son jehangir ali khan reflect her forever mood as she shares new photos from family vacay)

त्याचबरोबर हे फोटो शेअर करत करीनाने कॅप्शनमध्ये लिहिले की, “फॉरएव्हर मूड.” याचसोबत तिने हृदयाचे इमोजी देखील शेअर केले. त्याचबरोबर करीनाने तीन वेगवेगळे फोटो शेअर केले. पहिल्या फोटोमध्ये करीना साइडला पाहताना दिसत आहे. तर तिने याला कॅप्शन लिहिले आहे की, “मूड १.” दुसऱ्या फोटोमध्ये ती आकाशाकडे पाहत आहे आणि तिच्या मागे झाडे दिसून येत आहेत. हा फोटो शेअर करत तिने कॅप्शनमध्ये लिहिले की, “मूड २.”

त्याचबरोबर मागील एक आठवड्यापूर्वी सैफ अली खान, पत्नी करीना कपूर खान, मुलगा तैमूर आणि जहांगीर यांना मुंबईमधून बाहेर जाताना विमानतळावर स्पॉट केले होते. परंतु खान परिवार सुट्टीसाठी नक्की कुठे गेले आहे, हे अजून उघड झाले नाही. इतकेच नव्हे तर त्यांनी एकाही पोस्टमधून ठिकाण उघड केले नाही.

करीनाच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, ती आगामी चित्रपट ‘लाल सिंग चड्ढा’ यामधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर तिच्यासोबत आमिर खान देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट हॉलिवूड हिट फॉरेस्ट गम्पचा रिमेक आहे. जो २०१२ मध्ये प्रदर्शित झाले. हा चित्रपट दिग्दर्शक अद्वैत चंदन यांनी केले आहे. तर ‘लाल सिंग चड्ढा’ या चित्रपटातून तेलुगू अभिनेता नागा चैतन्य बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. या चित्रपटात मोना सिंग देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.

 

 

हे देखील वाचा