अभिनेत्री करिश्मा कपूर आज भलेही चित्रपटसृष्टीपासून दूर आहे परंतु सोशल मीडियावर मात्र नेहमीच ती मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. ती तिच्या कुटंबासोबत तसेच मित्रांसोबत मस्ती करताना फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. चाहत्यांना तिच्याकडे आकर्षित करण्याची एकही संधी ती सोडत नाही. अशातच करिश्माने दिवाळी साजरी केल्यानंतर अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यावेळी करिश्मा दिवाळी साजरी करण्यासाठी तिच्या बहिणीच्या म्हणजेच करिना कपूर खानच्या घरी गेली होती. तेथील अनेक फोटो तिने पोस्ट केले आहेत.
करिश्मा कपूरने सोशल मीडियावर दिवाळीचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यावेळी दोन्ही बहिणींनी मिळून दिवाळीचा आनंद घेतला आहे. करिश्माने एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये तिने करिनाचा छोटा मुलगा जेहला उचलून घेतले आहे. फोटोत त्या दोघांची बॉडिंग चाहत्यांना खूप आवडली आहे.
हा फोटो शेअर करून तिने लिहिले आहे की, “जेह बाबासोबत खरंच दिवाळी खूप खास आहे. खूप प्रेम.” करिश्मा जेहसोबत खूप खुश दिसत आहे. तो देखील त्याच्या मावशीसोबत आनंदी दिसत आहे. (Karishma kapoor share a diwali photo with jeh khan)
करिश्माने शेअर केलेल्या या फोटोमध्ये आपण पाहू शकतो की, तिने हिरव्या रंगाचा ड्रेस घातला आहे. तसेच करीनाने देखील सोशल मीडियावर तिच्या संपूर्ण कुटुंबासोबत सोशल मीडियावर फोटो शेअर एक आहे. या फोटोमध्ये तैमूर सैफ अली खानजवळ तर जेह करीनाजवळ दिसत आहे.
त्यांच्या या फोटोवर देखील चाहत्यांनी खूप प्रेम दर्शवले आहे. अनेकजण कमेंट्स करून त्यांना दिवाळीचा शुभेच्छा देत आहेत. करीना कपूर नुकतेच राजस्थान ट्रीपवरून परत आली आहे. तेथील अनेक फोटो आणि व्हिडिओ तिने सोशल मीडियावर शेअर केलं होते. तसेच अनेकवेळा ती जेह आणि तैमूरसोबत स्पॉट होत असते.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-सिल्व्हर रंगाच्या शिमरी गाऊनमधे करिश्मा कपूरचा घायाळ करणारा अंदाज पाहिला का?
-करीनाचा चिमुकला जेह दिसला आत्या सबाच्या मांडीवर खेळताना; पाहा ‘हा’ गोंडस फोटो