Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

अभिनेत्री करिश्मा तन्नाच्या लग्नांच्या विधींना झाली सुरुवात, गोव्यात संपन्न होणार आलिशान लग्न

सध्या बॉलिवूडमध्ये लग्नांचा सिझन सुरु आहे. एका मागोमाग एक मोठे मोठे कलाकार लग्नाच्या बंधनात अडकत असून, ही यादी वाढतच चालली आहे. कोरोनाचा संसर्ग देखील कमी झाल्यामुळे अनेक कलाकार आता लग्नाचा निर्णय घेताना दिसत आहे. नुकतीच अभिनेता मौनी रॉय तिच्या बॉयफ्रेंडसोबत सूरज नांबियारसोबत लग्नबंधनात अडकली आहे. आता लवकरच अभिनेत्री करिश्मा तन्ना देखील तिच्या बॉयफ्रेंडसोबत लग्न करत आहे. ५ फेब्रुवारी रोजी गोव्यातील एका फाईव्हस्टार हॉटेलमध्ये करिश्मा तिच्या उद्योगपती असेलेल्या बॉयफ्रेंडसोबत वरुण बंगेरासोबत विवाहबंधनात अडकणार आहे. या दोघांच्या लग्नाच्या आधीच्या सर्व विधींना आणि कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे.

एका रिपोर्टनुसार करिश्मा आणि वरुण यांच्या लग्नाचे कार्यक्रम ३ फेब्रुवारीपासून हळदीच्या फंक्शनने सुरु होत आहे. या लग्नामध्ये कोरोनाच्या सर्व अटी आणि नियमांचे पालन करत लग्नाची तयारी केली जात आहे. हळदीच्या कार्यक्रमाला अगदी जवळच्या नातेवाईकांसोबत जवळचे मित्रमैत्रिणी सामील होणार आहे. ४ फेब्रुवारीला या दोघांचे मेहेंदीचे होणार असून, यात देखील अतिशय मर्यादित लोकांना आमंत्रित केले गेले आहे. या फंक्शनची सजावट फुलं आणि पेस्टल रंगांचा वापर करून केली जाणार असल्याचे सांगितले जात आहे.

करिश्मा आणि वरुण यांचे लग्न ५ फेब्रुवारी शनिवारी संध्याकाळी मॅक्सिमम सिटीच्या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये लग्न संपन्न होणार आहे. या लग्नाला करिश्मा तन्नाच्या जवळच्या समजल्या जाणाऱ्या अनीता हसनंदानी, रिधिमा पंडित, एकता कपूरसोबत इंडस्ट्रीमधील इतर अनेक कलाकार देखील सामील होतील. लग्नाच्या तिन्ही दिवस शाकाहारी जेवण लोकांना वाढण्यात येईल.

करिश्मा आणि वरुण हे त्यांच्या लग्नाच्या सर्व फंक्शनला प्रसिद्ध फॅशन डिझायनर असलेल्या अनिता श्रॉफ यांनी डिझाइन केलेले आऊटफिट्स घालणार आहे. करिश्मा गुजराती तर वरुण मंगलोरचा असल्याने हे लग्न गुजराती आणि दाक्षिणात्य पद्धतीने होणार आहे. नुकतेच करिश्मा आणि वरुण यांना लग्नाची शॉपिंग करताना मार्केटमध्ये पाहिले गेले होते. स्वतः करिश्मानेच ती लग्न करत असल्याचे सांगितले होते.

हेही वाचा-

हे देखील वाचा