नव्वदच्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्री करिश्मा कपूर (Karisma Kapoor) सिंगल मदर आहे. करिश्मा कपूरला तिच्या चित्रपटांप्रमाणेच तिच्या वैयक्तिक आयुष्यातही ते स्थान मिळाले नाही, ज्याची ती हकदार होती. करिश्माचे लग्न अगोदर अभिषेक बच्चनसोबत (Abhishek Bachchan) ठरले होते. इतकेच नव्हे, तर दोघांनी साखरपुडाही केला होता. मात्र, काही कौटुंबिक समस्यांमुळे हे लग्न होऊ शकले नाही. या घटनेनंतर २००३ मध्ये, करिश्माचे लग्न दिल्लीतील व्यावसायिक संजय कपूरसोबत मोठ्या थाटात पार पडले.
असे मानले जात होते की, करिश्माला तिचा ‘मिस्टर राईट’ सापडला आहे. दोघांनाही दोन मुलेही (कियान आणि समायरा) झाली होती. मात्र, लग्नाच्या ११ वर्षानंतर म्हणजेच २०१४ मध्ये करिश्मा आणि संजयची जोडीही तुटली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, घटस्फोटादरम्यान करिश्मा आणि संजय यांच्यात बरीच भांडण झाली होती. संजयने तिला खर्च करण्यासाठी पुरेसे पैसे दिले नाहीत, असे करिश्माचे त्याच्यावर आरोप होते. तसेच अभिनेत्रीने तिच्या पतीवर मारहाणीचे गंभीर आरोपही केले होते. त्याचवेळी, करिश्माने केवळ पैशासाठी त्याच्याशी लग्न केले होते, असे संजयचे म्हणणे होते. (karisma kapoor before divorce put many allegations on husband sanjay kapoor)
मात्र, संजयपासून घटस्फोट घेतल्यानंतर करिश्माला मुंबईतील खार भागात घर आणि मुलांसाठी १४ कोटींची पोटगी मिळाली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, करिश्माला या पोटगीमधून दरमहा १० लाख रुपयांचे व्याज मिळते. एवढेच नाही, तर लग्नाच्या वेळी संजयच्या कुटुंबीयांनी करिश्माला दिलेले दागिनेही तिच्याकडून परत घेतले नाहीत.
कामाबद्दल बोलायचे झाले, तर करिश्मा कपूर ही मागच्या वर्षी ‘मेंटलहूड’ या वेबसीरिजमध्ये दिसली होती. या वेबसीरिजमध्ये तिने मिरा शर्मा हे पात्र निभावले होते. तिचे हे पात्र प्रेक्षकांना खूप आवडले होते.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा