बॉलिवूडमध्ये चित्रपटांमध्ये सोबत काम केल्यानंतर कधीही न तुटणाऱ्या अशा आगळ्या वेगळ्या काही जोड्या तयार झाल्या आहेत. या जोड्या फक्त अभिनेता अभिनेत्रींच्या नाही, तर काही जोडया अभिनेत्रींच्या, काही अभिनेत्यांच्या, अभिनेते दिग्दर्शक आदी अनेक जोड्यांचा यात समावेश आहे. एका सिनेमासाठी एकत्र आलेल्या कलाकारांची ही जोडी भविष्यातही सोबत येईल असे नाही. मात्र या जोड्या विविध कारणामुळे कधीतरी एकत्र येतात आणि त्यांच्या आठवणींना उजाळा देतात. बॉलिवूडमधील सर्वात गाजलेल्या जोड्यांपैकी एक जोडी म्हणजे माधुरी दीक्षित आणि करिश्मा कपूर.
यश राजच्या ‘दिल तो पागल है’ सिनेमात या दोन मोठ्या अभिनेत्री एकत्र आल्या आणि त्यांनी एकच धमाका केला. आजही सर्वांनाच हा सिनेमा लक्षात आहे. या रोमॅंटिक सिनेमाने प्रेक्षकांना चांगलीच भुरळ घातली होती. सिनेमातील पूजा आणि निशा यांची जोडी आणि त्यांच्यात होणारी डान्सची जुगलबंदी खूपच रंजक होती. नुकत्याच या दोघी अभिनेत्री एकत्र दिसल्या. त्यांच्या या भेटीचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
करिश्मा कपूर आणि माधुरी दीक्षित या दोघींना एकाच स्टुडिओमध्ये भेटीची संधी मिळाली. या भेटीचा एक फोटो करिश्माने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या फोटोमध्ये या दोघी एकमेकांना मिठी मारताना दिसत आहे. करिश्माने निळ्या आणि गुलाबी रंगाचा पॅटर्न असलेला ड्रेस घातला असून, माधुरीने मिंट ग्रीन कलरची साडी नेसली आहे. हा फोटो शेअर करताना करिश्माने कॅप्शनमध्ये लिहिले, “बघा स्टुडिओमध्ये माझी कोणासोबत भेट झाली. माझी नेहमीच ऑल टाईम आवडती माधुरी दीक्षित.”
करिश्मा कपूरच्या या पोस्टवर तिचे आणि माधुरी फॅन्स भरभरून कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव करताना दिसत आहे, या पोस्टवर माधुरीने कमेंट करताना हसणारा ईमोजी आणि हार्ट ईमोजी पोस्ट केला आहे. अनेकांना हा फोटो पाहून ‘दिल तो पागल है’ चित्रपटाची आठवण झाली. एकाने कमेंटमध्ये लिहिले, “दिल तो पागल है पार्ट २’, ‘ अजून एकाने लिहिले, “‘अरे रे अरे ये क्या हुआ..मोमेंट’ तर एकाने लिहिले, ‘दिल तो पागल है गर्ल्स’
तत्पूर्वी दिल तो पागल है सिनेमात माधुरी दीक्षित आणि शाहरुख खान मुख्य भूमिकेत होते तर करिश्मा कपूर आणि अक्षय कुमार सहायक भूमिकेत होते. या चित्रपटात या दोघीनी डान्सरची भूमिका साकारली होती. या चित्रपटासटाही माधुरीला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्मफेयर पुरस्कार मिळाला तर करिश्माला सहायक अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा :