Monday, February 24, 2025
Home बॉलीवूड सोज्वळ करिश्मा कपूरच्या बोल्ड फोटोंनी वाढला नेटकऱ्यांचा पारा, म्हणाले, ‘तुझं आता सगळं…’

सोज्वळ करिश्मा कपूरच्या बोल्ड फोटोंनी वाढला नेटकऱ्यांचा पारा, म्हणाले, ‘तुझं आता सगळं…’

अभिनेत्री करिश्मा कपूर ही ९० च्या दशकातील सुपरहिट हिरोईनपैकी एक आहे. जरी ती यापुढे चित्रपटांमध्ये दिसत नसली तरी, करिश्मा सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे आणि अनेकदा तिचे फोटो चाहत्यांसह शेअर करताना दिसत आहे. सध्या, आज अभिनेत्रीने तिचा नवीनतम फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये ती नो-मेकअप लूकमध्ये दिसत आहे. हा फोटो पाहिल्यानंतर काही यूजर्स त्याचे कौतुक करताना दिसले, तर अनेक जण तिला ट्रोलही करत आहेत.

करिश्मा कपूरने तिच्या इंस्टाग्रामवरून शेअर केलेल्या ताज्या फोटोमध्ये ती जांभळ्या रंगाच्या डीप नेक ड्रेसमध्ये दिसत आहे. अभिनेत्रीने मोकळे केस आणि काउरी नेकपीसने बनवलेल्या सोन्याच्या साखळीने हा लूक पूर्ण केला. ती मेकअपशिवाय दिसत असली तरी. हा फोटो शेअर करताना करिश्माने नो फिल्टर हॅशटॅगही वापरला आहे. ती समुद्राच्या किनाऱ्यावर दिसते.

करिश्माचा हे नवीन फोटो पाहिल्यानंतर यूजर्स एकामागून एक कमेंट करताना दिसत आहेत. फोटोवर  प्रतिक्रिया देताना एकाने खूप कमजोरी आहे अशी प्रतिक्रिया दिली आहे. त्याचवेळी दुसर्‍या एकाने – ही काय अवस्था आहे, काही का घेत नाही. अशी मजेशीर प्रतिक्रिया दिली आहे. तर अनेकांनी ते आकर्षण आता संपले आहे असे म्हणत तिची खिल्ली उडवली आहे. अनेक यूजर्स करिश्माच्या वयावर टोमणे मारतानाही दिसले. परंतु व्हायरल फोटोंमुळे ट्रोल होण्याची करिश्माची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही करिश्मा अनेकदा तिचे विना-मेकअप फोटो शेअर करते आणि ती आत्मविश्वासाने पोज देताना दिसते.

 

वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर करिश्मा लवकरच OTT वर दिसणार आहे. अभिनय देव दिग्दर्शित ब्राउन या वेब सीरिजमध्ये ही अभिनेत्री दिसणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ब्राउन सीरिजची कथा ‘सिटी ऑफ डेथ’ या पुस्तकावर आधारित आहे.

हेही वाचा – सोनाली बेंद्रेच्या मनमोहक अदा! पाहा फोटो गॅलरी
कार्तिक आर्यनच्या करिअरची गाडी एकदम सुसाट! ‘या’ आगामी चित्रपटांची भलीमोठी यादी एकदा पहाच
‘बिग बॉस ओटीटी’मध्ये घालण्यासाठी उधारीने आणलेले कपडे, खुद्द उर्फीनेच केलाय खुलासा

हे देखील वाचा