Sunday, December 22, 2024
[aioseo_breadcrumbs]

करण सिंग ग्रोवर-सुरभी ज्योतीची जोडी पुन्हा येणार प्रेक्षकांच्या भेटीला, ‘या’ सिरीजमध्ये दिसणार एकत्र

टीव्ही कलाकारांच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर ‘करण सिंग ग्रोवर’ आणि ‘सुरभी ज्योती’ यांची जबरदस्त केमिस्ट्री प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. हो जोडी शो ‘कबूल है 2.0’मध्ये दिसणार आहे. या सिरीजचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. हा शो टीव्ही शो ‘कबूल हैं ‘ याचा सिक्वेल आहे. ज्यामध्ये करण सिंग ग्रोवर आणि सुरभी ज्योती हे पुन्हा एकदा दिसणार आहेत. टीव्हीवरील सुपरहिट शोमधून त्यांनी प्रत्येकाच्या मनावर राज्य केलं होते आणि पुन्हा एकदा प्रेक्षकांच मनोरंजन करण्यासाठी ही जोडी सज्ज झाली आहे.

या शोच्या पाहिल्या पार्टला प्रेक्षकांनी खूपच पसंती दिली आहे. प्रेक्षकांना त्यांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री खूपच आवडली होती. कबूल हैं 2.0 या शोला घेऊन अशी चर्चा आहे की, याची कथा पहिल्या भागाच्या कथेपेक्षा खूपच वेगळी असणार आहे.

हा शो युरोपमध्ये चित्रित केला गेला आहे. हा शो पाहून कदाचित सगळ्यांना ‘एक था टायगर’ या चित्रपटाची आठवण येईल. परंतु प्रेक्षकांनी कोणतेही मत बनवण्याआधी याचा ट्रेलर बघितला पाहिजे.

करणने या सीरिजमध्ये एका भारतीय एजेंटचं पात्र निभावलं आहे. सुरभी ही पाकिस्तानी मुलगी आहे. ट्रेलरमध्ये मंदिरा बेदी देखील आहे, जी जोयाच्या शोधत आहे. या ट्रेलरमध्ये असे दाखवले आहे की, असद जोयाच्या वडिलांची हत्या करतो. ज्यामुळे जोयाचे हृदय तुटत. या सीरिजमध्ये दोन दुष्मनांमधील प्रेम कहाणी दाखवली आहे.

या सीरिजचा ट्रेलर पूर्णपणे रोमान्स, ड्रामा, आणि ऍक्शनवर आधारित आहे. या सीरिजमध्ये 10 एपिसोड दाखवले जातील. लोकप्रिय अभिनेता करण सिंग पुन्हा एकदा प्रेक्षकांचं मन जिंकून घेईल हे बघणे महत्त्वाचे ठऱणार आहे.

हे देखील वाचा