कर्नाटक सरकारने म्हैसूर सँडल साबण तयार करणाऱ्या कर्नाटक सोप्स अँड डिटर्जंट्स लिमिटेड (केएसडीएल) ची ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून बॉलीवूड अभिनेत्री तमन्ना भाटिया यांची नियुक्ती केली आहे. बुधवारी जारी केलेल्या राज्य सरकारच्या आदेशात भाटिया यांची ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून दोन वर्षे आणि दोन दिवसांसाठी नियुक्ती करण्यात आली आहे, ज्याची किंमत ६.२ कोटी रुपये असेल. परंतु या निर्णयावर लोकांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.
समाजातील काही घटकांनी या निर्णयावर जोरदार टीका केली आणि त्यांच्या नियुक्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. एका महिलेने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’ वर पोस्ट लिहून या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तिने लिहिले, “जेव्हा आशिका रंगनाथ सारख्या स्थानिक कन्नड तरुण अभिनेत्रींना ब्रँड अॅम्बेसेडर बनवता येते, तर मग हिंदी अभिनेत्रींची नियुक्ती आणि पदोन्नती का केली जात आहे?”
यावर प्रतिक्रिया देताना राज्याचे वाणिज्य आणि उद्योग मंत्री एमबी पाटील यांनी गुरुवारी सांगितले की, “कर्नाटकाबाहेरील बाजारपेठांमध्ये आक्रमकपणे प्रवेश करण्यासाठी” बराच विचारमंथन केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. पाटील म्हणाले की केएसडीएलला कन्नड चित्रपट उद्योगाबद्दल खूप आदर आहे आणि काही कन्नड चित्रपट बॉलिवूड चित्रपटांना कडक स्पर्धा देत आहेत.
तमन्ना ही या साबणाची जाहिरात करणारी दुसरी बिगर-स्थानिक ब्रँड अॅम्बेसेडर आहे. २००६ मध्ये, माजी भारतीय कर्णधार एमएस धोनीने या साबणाची जाहिरात केली होती. कर्नाटक ट्रान्सपरन्सी इन पब्लिक प्रोक्योरमेंट अॅक्ट (केटीपीपी) च्या कलम ४ (जी) अंतर्गत केएसडीएलला अभिनेत्याला ६.२ कोटी रुपयांचे थेट पेमेंट करण्याची सूट देण्यात आली आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
२५ वर्षांनंतर पुन्हा रिलीझ होतोय धडकन सिनेमा; या तारखेपासून सिनेमागृहात घ्या आनंद