अक्षय कुमारचा (Akshay Kumar) आगामी ‘पृथ्वीराज’ हा चित्रपट अवघ्या १० दिवसांत, म्हणजेच ३ जून रोजी चित्रपटगृहात दाखल होणार आहे. परंतु लवकरच चित्रपटाला विरोधांचा सामना करावा लागू शकतो, असे दिसत आहे. कारण आता या चित्रपटाला करणी सेनेच्या वतीने निषेध करण्यात आला आहे.
याआधीच्या वृत्तानुसार, समूहाने चित्रपटाच्या शीर्षकावर आक्षेप घेतला होता आणि ‘पृथ्वीराज’ बदलून ‘सम्राट पृथ्वीराज चौहान’ करण्याची मागणी केली होती. अलीकडील अहवालानुसार, राजस्थानस्थित संस्था शीर्षक बदलाबाबत ठाम आहे आणि चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी याची स्क्रीनिंग केली जावी, अशी त्यांची इच्छा आहे. (karni sena is protesting against akshay kumar s film prithviraj)
माध्यमाशी अलीकडेच झालेल्या संभाषणात, करणी सेनचे सुरजित सिंग राठौर YRF बद्दल बोलले, ज्यांनी अक्षय कुमार स्टारर चित्रपटाचे शीर्षक बदलून ‘सम्राट पृथ्वीराज चौहान’ असे करण्याचे आश्वासन दिले होते. ते म्हणाले, “आम्ही यशराज फिल्म्सचे सीईओ अक्षय विधान यांना भेटलो असून, त्यांनी शीर्षक बदलण्याचे आश्वासन दिले आहे. त्यांनी आमची मागणी मान्य करण्याचे मान्य केले आहे.”
‘चित्रपट रिलीझ होऊ देणार नाही’
मात्र, YRF शी संबंधित एका स्रोताने अशी कोणतीही माहिती असण्याचे नाकारले. यावर प्रतिक्रिया देताना राठोड यांनी पोर्टलला सांगितले की, “जर त्यांनी बदल केले नाहीत आणि चित्रपटाचे स्क्रीनिंग केले नाही, तर पृथ्वीराज राजस्थानमध्ये प्रदर्शित होणार नाही.” सुरजितसिंग राठोड गंभीर स्वरात म्हणाले, “आम्ही राजस्थानच्या प्रदर्शकांना याबद्दल आधीच सावध केले आहे. जर चित्रपटाचे शीर्षक सम्राट पृथ्वीराज चौहान असे बदलले नाही, तर आम्ही राजस्थानमध्ये चित्रपट दाखवू देणार नाही.”
चंद्रप्रकाश द्विवेदी दिग्दर्शित पृथ्वीराजमध्ये अक्षय कुमार मुख्य भूमिकेत आहे, तर मानुषी छिल्लर (Manushi Chhillar) राजकुमारी संयोगिता म्हणून हिंदी चित्रपटात पदार्पण करत आहे. ऐतिहासिक ऍक्शन ड्रामामध्ये काका कान्हाच्या भूमिकेत संजय दत्त (Sanjay Dutt), चांद बर्दाईच्या भूमिकेत सोनू सूद (Sonu Sood), मुहम्मद घोरीच्या भूमिकेत मानव विज आणि इतर अनेक कलाकार आहेत.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा