Saturday, June 29, 2024

अफलातून! ‘या’ चित्रपटासाठी कार्तिक आर्यनने वाढवले तब्बल १४ किलो वजन; फिटनेस ट्रेनरनेकडून तोंडभरून कौतुक

बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन इंडस्ट्रीमध्ये त्याच्या कसदार अभिनयासाठी प्रसिद्ध आहे. सोशल मीडियावर कार्तिकचा मोठा चाहतावर्ग आहे. चित्रपट आणि त्याच्या देखण्या लूकमुळे कार्तिक नेहमीच चर्चेत असतो. अलीकडेच कार्तिकने त्याच्या आगामी चित्रपटासाठी केलेल्या शारीरिक बदलामुळे तो माध्यमात चर्चेचा विषय बनला आहे. एकता कपूर निर्मित ‘फ्रेडी’ चित्रपटात भूमिका करण्यासाठी कार्तिकने चांगलेच वजन वाढवले आहे.

कार्तिक आर्यन त्याच्या आगामी ‘फ्रेडी’ चित्रपटासाठी चांगलाच उत्सुक झाला आहे. सोशल मीडियावरून तो नियमित चित्रपटांसबंधित माहिती आपल्या चाहत्यांना देत असतो. कार्तिक त्याच्या बहारदार अभिनयामुळे सिने जगतात खूपच लोकप्रिय आहे. एकता कपूरच्या ‘फ्रेडी’ चित्रपटासाठी कार्तिकने तब्बल 14 किलो वजन वाढवले आहे. त्यामुळे तो चांगलाच चर्चेत आला आहे.

याची माहिती कार्तिकचे फिटनेस ट्रेनर समीर चौरा यांनी दिली आहे. नुकताच त्यांनी एका कार्यक्रमात कार्तिक आर्यनच्या भूमिकेसाठी बॉडी ट्रान्सफॉर्मेशन आणि वजन वाढविण्यासंबधी माहिती दिली. ‘फ्रेडी’मध्ये आपल्या भूमिकेत जिवंतपणा आणण्यासाठी कार्तिक आर्यनने समीर चौरांच्या मदतीने तब्बल 14 किलो वजन वाढवले आहे.

याबद्दल बोलताना समीर चौरा म्हणाले की, “शारीरिक बदल करणे म्हणजे फक्त जाड किंवा बारिक होणे नव्हे, यासाठी खूप काळजी आणि मेहनत घ्यावी लागते. तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली आणि सुरक्षितरीत्या हे काम करावे लागते. यासाठी कडक शिस्तीची गरज असते. ठरवून दिलेला व्यायाम आणि योग्य आहाराची यासाठी आवश्यकता असते. कार्तिकने या चित्रपटातील भूमिकेसाठी 14 किलो वजन वाढवले आहे.”

याबद्दल पुढे बोलताना समीर चौरा म्हणतात की, “कार्तिकने यासाठी दिलेल समर्पण अविश्वसनीय आहे. आनुवंशिकदृष्टया तो दुबळा आहे, तरीही ठरवलेल्या कालावधीत वजन वाढवणे कौतुकास्पद आहे. इतकेच नव्हे, तर ‘फ्रेडी’नंतर त्याच्या दुसर्‍या चित्रपटासाठी त्याने वजन कमी करायला सुरुवात सुद्धा केली आहे.”

दरम्यान कार्तिकची भूमिका असलेल्या या चित्रपटात त्याच्यासोबत अलाया एफ ही अभिनेत्री झळकणार आहे. नुकतेच तिने सोशल मीडियावरुन चित्रपटाच शूटिंग पूर्ण झाल्याची माहिती दिली आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अभिनेते अनुपम खेर यांनी हिंदू धर्माबद्दल केले मोठे वक्तव्य; म्हणाले, ‘हिंदू असणे हे जीवन…’

-मोठी घडामोड! एकीकडे जामीन अर्जावर सुनावणी सुरु असतानाच आर्यन खानची आर्थर रोड कारागृहात रवानगी

-आर्यनचे वकील मानेशिंदेंचे मोठे वक्तव्य; म्हणाले, आर्यनला ‘ग्लॅमरचा तडका’ लावण्यासाठी…

हे देखील वाचा