Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

लॅम्बोर्गिनीच्या बोनेटवर ठेऊन चाऊमीन खाताना दिसला कार्तिक आर्यन, अभिनेत्याच्या साधेपणावर भाळले चाहते

कार्तिक आर्यनचा सध्या बॉलिवूडमध्ये चांगलाच बोलबाला आहे. त्याच्या स्टाईल आणि साधेपणाचे चाहते दीवाने आहेत. अलीकडेच, कार्तिकचा असा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, जो पाहून चाहते त्याच्या आणखीनच प्रेमात पडत आहेत. महागड्या हॉटेल्स, स्टोअर्समधून बाहेर पडणाऱ्या कलाकारांचे फोटो तुम्ही पाहिले असतीलच, पण रस्त्याच्या कडेला हातगाडीवर फार कमी कलाकार दिसतात.

चाऊमीन खाताना दिसला अभिनेता
कार्तिकचा असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो शहरातील एका स्नॅक कॉर्नरवर आपल्या मित्रासोबत चायनीज फूडचा आस्वाद घेत आहे. यादरम्यान पॅपराजी आणि चाहत्यांनी त्याला आपल्या कॅमेऱ्यात कैद केले. आर्यननेही हसत त्यांच्यासोबत फोटो काढले. कॅज्युअल आउटिंगसाठी अभिनेत्याने डेनिम लुक निवडला. ( karthik aryan was seen eating chowmein on lamborghini s bonnet video goes viral on internet)

चाहते करतायेत कौतुकाचा वर्षाव
मध्य प्रदेशातील ग्वालियर शहरातील आर्यनचा साधेपणा चाहत्यांच्या मनात घर करून गेला. खरंतर आर्यनने त्याची लॅम्बोर्गिनी फूड व्हॅनसमोर उभी केली होती आणि या महागड्या गाडीच्या बोनेटवर ठेवून तो आपल्या मित्रासोबत चाऊमीन खात होता. आर्यन सलमान खानसोबत ‘बिग बॉस १५’ शोचे शूटिंग करून परतत होता. येथे तो त्याच्या ‘धमाका’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी गेला होता.

अभिनेत्याचा हा अंदाज पाहून चाहते खूपच प्रभावित झाले आहेत. एका चाहत्याने कमेंट केली, “तो खूप नम्र आहे. खूप सुंदर माणूस.” दुसरा म्हणाला, “महान अभिनेता, आपल्या मातीशी जोडलेला आहे.” त्यामुळे त्याचवेळी काही युजर्सने याला पब्लिसिटी स्टंट असेही म्हटले आहे. याच्या काही तासांपूर्वी, कार्तिक सलमानसोबत ‘बिग बॉस १५’मध्ये वीकेंड का वारच्या एपिसोडसाठी सामील झाला होता. दोघांनी रॅपिड फायर राऊंड खेळला ज्यामध्ये सलमानने कार्तिकला काही मजेदार प्रश्नांची उत्तरे विचारली.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-राजकुमार- पत्रलेखाच्या एंगेजमेंटचा व्हिडिओ आला समोर; फिल्मी स्टाईलमध्ये म्हणाला, ‘माझ्याशी लग्न करशील?’

-पॅपराजीने पोझ द्यायला सांगताच भडकला रणबीर कपूर, रागाच्या भरात म्हणाला…

-राजकुमार अन् पत्रलेखाच्या मेहंदी सोहळ्यात पोहोचली हुमा कुरेशी, जोडपे आज अडकेल रेशीमगाठीत

हे देखील वाचा