बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतो. अलीकडेच त्याचा ‘धमाका’ हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित झाला, ज्याला प्रेक्षकांनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या. कार्तिक आर्यन त्याच्या चित्रपटांव्यतिरिक्त त्याच्या लव्ह लाईफमुळे देखील चर्चेत आहे. इतकेच नाही, तर तो त्याच्या चाहत्यांशी जोडण्याची संधीही सोडत नाही. तर या सगळ्यामध्ये कार्तिक आर्यनबद्दल अनेक वेळा नकारात्मक बातम्याही समोर आल्या आहेत, ज्यावर आता त्याने आपले मौन तोडले आहे. जेव्हा त्याच्याबद्दल कोणतीही नकारात्मक बातमी समोर येते, तेव्हा तो कसा प्रतिक्रिया देतो हे अभिनेत्याने उघड केले आहे.
अलीकडेच कार्तिक आर्यनने एक मुलाखत दिली आहे, ज्यामध्ये अभिनेत्याने सांगितले आहे की, त्याच्यासाठी अनेक नकारात्मक बातम्या समोर आल्या आहेत, ज्या पाहिल्यानंतर तो हसतो. अभिनेता म्हणाला, “पूर्वी मला वाईट वाटायचे कारण मला माझ्या कुटुंबाचा सामना करावा लागायचा. मग मला वाटायचं की त्यांना कळलं तरी, ते या गोष्टी माझ्याशी शेअर करणार नाहीत. आता माझ्याबद्दल इतक्या गोष्टी बोलल्या जातात, ज्यामुळे आता मला भीती वाटत नाही. आता या बातम्या ऐकून मला हसू येते.” (kartik aaryan broke his silence on the negative news made on himself)
कार्तिक आर्यन पुढे म्हणाला, “मला नेहमी गप्प राहायला आवडते. एक धमाका होतो आणि मग लोक माझी स्तुती करतात. ही गोष्ट पाहून मला नेहमी हसू येते आणि नंतर मी झोपून जातो. या छोट्या-छोट्या गोष्टींचा माझ्यावर परिणाम होत नाही, पण त्या मला आनंद देतात. पुढे काय होईल याची मला पर्वा नाही. मी या सर्व गोष्टींपेक्षा चांगले काम करण्यास प्रवृत्त आहे.” कार्तिक आर्यनने त्याच्या ‘धमाका’ चित्रपटाचे प्रमोशन करत असतानाही नकारात्मक बातम्यांवर प्रतिक्रिया दिली होती. त्यावेळी अभिनेता म्हणाला होता की, अशी बातमी पाहून कुटुंबाला वाईट वाटते.
सध्या कार्तिक आर्यन त्याच्या आगामी चित्रपटांच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. त्याच्याकडे अनेक मोठे प्रकल्प आहेत. त्याच्याकडे ‘भूल भुलैया २’, ‘फ्रेडी’, ‘शहजादा’, ‘कॅप्टन इंडिया’ सारखे चित्रपट आहेत.
हेही वाचा-










