Friday, July 5, 2024

क्या बात है! कोरोनातून बरा झाल्यावर कार्तिक आर्यनने खरेदी केली लॅम्बॉर्गिनी, किंमत वाचून उंचावतील तुमच्याही ‘भुवया’

कोरोनाच्या विळख्यात अनेक बॉलिवूड कलाकार अडकले आहेत. सोबतच अनेक कलाकार बरे होऊन परतताना देखील दिसत आहे. आता काही दिवसांपूर्वी अभिनेता कार्तिक आर्यन हा कोरोनाच्या विळख्यात सापडला होता.पण आता तो बरा झाला असल्याची माहिती त्याने सोशल मीडियावरून सर्वांना दिली आहे. यासोबतच त्याच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी येत आहे. कोरोना आजारातून बरा होताच कार्तिकने नवीन लग्झरी गाडी खरेदी केली आहे.

कार्तिक आर्यन हा जेव्हा त्याच्या शूटिंगवर पोहोचला, तेव्हा तो काळ्या रंगाच्या लॅम्बॉर्गिनी या गाडीतून येताना दिसला. त्याने ही नवीन गाडी खरेदी केली आहे. कार्तिकच्या या गाडीची किंमत 4.5 कोटींच्या आसपास आहे. त्याच्या गाडी सोबतचे फोटो सोशल मीडियावर खूपच वेगाने व्हायरल होताना दिसत आहेत. त्याने या गाडीसमोर उभे राहून पोझ दिल्या आहेत. या फोटोमध्ये तो खूपच कुल दिसत आहे. गाडीचा एक व्हिडिओ शेअर करून त्याने लिहिले आहे की, “घेतलीच, कदाचित मी महागड्या वस्तूंसाठी बनलेलोच नाही.” यासोबतच त्याने पुढे हसण्याची ईमोजी पोस्ट केली आहे.

कोरोनातून बरा झाल्यानंतर कार्तिक हा पहिल्यांदाच कामावर आला आहे. याआधी तो शेवटचा 22 मार्चला स्पॉट झाला होता. कार्तिकने लॅक्मी फॅशन वीकमध्ये वॉक केला होता. त्याचे ही व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

विशेष म्हणजे, कार्तिककडे बीएमडब्ल्यू गाडीही आहे. ही गाडी त्याने सन 2017 मध्ये खरेदी केली होती. याव्यतिरिक्त त्याने सन 2019 मध्ये आपल्या आईला मिनी कूपरची शानदार गाडीही भेट म्हणून दिली होती. ही तिच्या आईची आवडती गाडी आहे.

कार्तिकने 2011 मध्ये ‘प्यार का पंचनामा’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर त्याने ‘कांची द अनब्रेकेबल’, ‘सोनू के टिटू की स्विटी’, ‘लुका छुप्पी’, ‘पती पत्नी और वो’ या चित्रपटात काम केले आहे. तसेच तो लवकरच त्याच्या ‘भूल भुलैया’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत कियारा आडवाणी ही देखील असणार आहे. यासोबतच तो ‘धमाका’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तो एका पत्रकाराची भूमिका निभावताना दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-जोडप्याच्या ‘बारिश की जाए’ गाण्यावरील डान्सने जिंकले सर्वांचे मन, गायक बी प्राकने शेअर केला जबराट व्हिडिओ

-नाचा रे! वडील कमल हासन यांच्या निवडणूक प्रचारासाठी अभिनेत्रीने लावले ढोल- ताशावर ठुमके, पाहा जबरदस्त डान्स व्हिडिओ

-‘मूर्खपणा शिगेला पोहोचला आहे’, मास्क न लावल्यामुळे टीव्ही कलाकारांनी सुनावले कंगना रणौतला खडेबोल

हे देखील वाचा