ऑगस्ट महिन्यातील पहिला रविवार हा जगभरात फ्रेंडशिप डे म्हणून साजरा केला जातो. यावेळी प्रत्येकाने आपल्या खास, स्पेशलपर्यंत सर्वांनी आपल्या मित्राला या मैत्रीदिनाच्या शुभेच्छा दिल्या. यामध्ये चित्रपट कलाकारांचाही समावेश आहे. अनेक बॉलिवूड स्टार्सनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या चाहत्यांसह त्यांच्या जवळच्या व्यक्तींना फ्रेंडशिप डेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. दुसरीकडे, फ्रेंडशिप डेच्या निमित्ताने बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनने त्याच्या खास मित्राची चाहत्यांना ओळख करून दिली आहे. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
कार्तिक आर्यन (Kartik Aryan) हा बॉलिवूडचा चॉकलेट बॉय म्हणून ओळखला जातो. कार्तिकच्या दमदार अभिनयाची चर्चा तर होतेच त्याचबरोबर त्याच्या देखण्या लूकचीही सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगलेली पाहायला मिळते. याच लूकमुळे कार्तिकचे सोशल मीडियावर असंख्य चाहते आहेत जे त्याच्या प्रत्येक पोस्टवर प्रतिक्रिया देताना दिसत असतात. नुकताच कार्तिक आर्यनने फ्रेंडशिप डे निमित्त त्याच्या खास मित्राची आपल्या चाहत्यांना ओळख करुन दिली आहे. कार्तिकचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे.
कार्तिक आर्यनने त्याचा लेटेस्ट व्हिडिओ त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये अभिनेत्यासोबत एक छोट कुत्र्याचं पिल्लू देखील दिसत आहे.व्हिडिओमध्ये कार्तिक आर्यन काळ्या रंगाच्या हुडीमध्ये दिसत आहे. त्याने काळ्या रंगाचा सनग्लासेस घातला आहे. व्हिडिओमध्ये कार्तिक आर्यन त्याच्या या गोड मित्रावर खूप प्रेम करताना दिसत आहे. तेरा यार हूं मैं हे गाणे व्हिडिओच्या पार्श्वभूमीवर वाजताना ऐकू येत आहे.
View this post on Instagram
त्याचा हा व्हिडिओ शेअर करत अभिनेत्याने एक खास कॅप्शन लिहिले आहे. कॅप्शनमध्ये त्याने लिहिले, ‘ये तेरा यार हूं मैं है. फ्रेंडशिप डेच्या शुभेच्छा. कार्तिक आर्यनच्या चाहत्यांना हा व्हिडिओ खूपच आवडला आहे. अनेकांनी त्यावर जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत.
हेही वाचा –
रणवीरच्या न्यूड फोटोशूटवर ट्विंकल खन्नाची पहिली प्रतिक्रिया; म्हणाली, ‘मी झूम करुन करुन बघितलं पण…’
जेव्हा चालू चित्रपटातून निर्मात्याने अमिताभ बच्चन यांना दाखवला होता बाहेरचा रस्ता, असा घेतला बदला
बॉलिवूडची स्टाईलिश अभिनेत्री समिरा रेड्डी आता दिसते ‘अशी’, व्हिडिओ पाहून चाहतेही थक्क