Thursday, April 17, 2025
Home बॉलीवूड भुल-भुलैय्या दोनच्या रिलीझची तारिख ठरली, राजपाल यादवसह हे कलाकार दिसणार मुख्य भूमिकेत

भुल-भुलैय्या दोनच्या रिलीझची तारिख ठरली, राजपाल यादवसह हे कलाकार दिसणार मुख्य भूमिकेत

सध्या बॉलिवूडमध्ये रिमेक आणि सिक्वलचा जोरदार ट्रेण्ड आला आहे. अनेक जुन्या, दाक्षिणात्य, इतर वेगळ्या सिनेमांचे रिमेक आणि सिक्वल येण्याचे प्रमाण मागच्या काही वर्षांपासून खूपच वाढले आहे. त्यात आता अजून एका सिनेमाच्या सिक्वलची भर पडणार आहे. हा सिनेमा आहे कार्तिक आर्यनचा आगामी ‘भूल भुलैया २′. अक्षय कुमार, विद्या बालन, परेश रावल आदी कलाकारांच्या प्रमुख भूमिका असलेला आणि २००७ साली आलेला भूल भुलैया हा सिनेमा तुफान गाजला.

कथा, अभिनय, गाणी या सर्वच कसोट्यांवर सिनेमा पुरेपूर उतरला. याच सुपरहिट सिनेमाचा सिक्वल येणार असल्याची घोषणा काही महिन्यांपूर्वीच झाली होती. आता मात्र या सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी यांची मुख्य भूमिका असणारा ‘भूल भुलैया २’ हा चित्रपट येत्या १९ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे.

नुकतीच सोशल मीडियाच्या माध्यमातून या सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. टी सिरीजच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून या तारखेची घोषणा करण्यात आली आहे. सोबतच कार्तिक आर्यन, कियारा अडवाणी यांनी देखील त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून पोस्ट करत ही तारीख फॅन्ससोबत शेयर केली आहे.

कार्तिकने त्याचा आणि राजपाल यादवचा एक आगळा वेगळा फोटो आणि ‘हमारा नंबर भी आयेगा’ म्हणत प्रदर्शनाची तारीख सांगितली आहे.

तर कियाराने तिचा आणि कार्तिकचा एक रोमँटिक फोटो पोस्ट करत रिलीज डेट सांगितली आहे.

‘भूल भुलैया २’ हा सिनेमा साइकोलॉजिकल ड्रामा असणार आहे. या सिनेमाची निर्मिती भूषण कुमार, कृष्ण कुमार, मुराद खेतानी यांनी केली असून, अनिस बज्मी यांनी दिग्दर्शित केली आहे.

हे देखील वाचा