Sunday, June 8, 2025
Home बॉलीवूड ‘हे कोणाचे मूल हरवले?’, कार्तिक आर्यनने तोंड काळे झालेला फोटो केला शेअर; नेटकऱ्यांनी घेतली मजा

‘हे कोणाचे मूल हरवले?’, कार्तिक आर्यनने तोंड काळे झालेला फोटो केला शेअर; नेटकऱ्यांनी घेतली मजा

बॉलिवूडमधील हँडसम अभिनेता म्हणजे कार्तिक आर्यन. कार्तिक आर्यनची सोशल मीडियावर खूप फॅन फॉलोविंग आहे. त्याचे कोणतेही फोटो त्याने सोशल मीडियावर शेअर करता क्षणीच व्हायरल होत असतात. अशातच या कोरोना महामारीमध्ये कार्तिक आर्यनने त्याचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्याच्या या फोटोवर त्याचे चाहते नाही तर अगदी अनेक कलाकारांनी देखील प्रतिक्रिया दिल्या आहेत. कार्तिकने जो फोटो शेअर केला आहे त्या फोटोमध्ये त्याचे तोंड काळे झाले आहे. त्याचे डोळे आणि ओठ सोडून बाकी पूर्ण चेहरा काळा झाला आहे. त्याचा हा फोटो मास्क घालण्याचा संदेश देत आहे.

कार्तिक आर्यनने शेअर केलेल्या त्याच्या या फोटोमध्ये वी नेकचा पांढऱ्या रंगाचा टी- शर्ट परिधान केला आहे. तसेच सोबत जिंकण्याचे चिन्ह दिसत आहे. कार्तिक आर्यन या फोटोमध्ये मास्क घाला असा संदेश देताना दिसत आहे. त्याने शेअर केलेल्या या अनोख्या फोटोला आतापर्यंत 10 लाखांपेक्षाही अधिक लाईक्स मिळाले आहेत. त्याच्या या फोटोवर नेटकऱ्यांनीही मजा घेतली आहे. त्याला काहींनी मास्क घालण्याचा संदेश दिला आहे, तर एका युजरने लिहिले आहे की, “हा असाच आहे की, याच्या आईने याला मजेने सांगितले की गाईचे शेण तुझ्या चेहऱ्यावर चांगले दिसते म्हणून तू लावले आहे.” दुसऱ्या एका युजरने लिहिले आहे की, “हे कोणाचे मूल हरवले?.”

मार्चमध्ये कार्तिक आर्यन याला देखील कोरोनाची लागण झाली होती. त्याने या गोष्टीची माहिती सोशल मीडियावर दिली होती. कोरोना निगेटिव्ह आल्यावर त्याने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर लिहिले होते की,”निगेटिव्ह, 14 दिवसाचा वनवास संपवून पुन्हा एकदा कामावर आलो आहे.”

कार्तिक आर्यन नुकताच करण जोहरच्या ‘दोस्तांना 2’ या चित्रपटातून बाहेर होण्याच्या बातमीमुळे चर्चेत आला होता. त्याच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, तो लवकरच ‘भूल भुलैया 2’ या चित्रपटात कियारा आडवाणी आणि तब्बू सोबत दिसणार आहे. तसेच तो ‘धमाका’ या चित्रपटात देखील दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-मास्क न घालता रस्त्यावर ईद साजरी करत होती मुलगी, राखी सावंतने शिकवला चांगलाच धडा; पाहा व्हायरल व्हिडिओ

-अरे व्वा! अगस्त्यने टाकले पहिले पाऊल, हार्दिक आणि नताशाने केला व्हिडिओ शेअर

-‘ओव्हर ऍक्टिंगचे ५० रूपये कट करा’, लस टोचवताना मराठी अभिनेत्रीची नौटंकी पाहून नेटकऱ्यांनी केले ट्रोल!

हे देखील वाचा