Saturday, January 17, 2026
Home बॉलीवूड स्वतःच्या बहिणीच्या लग्नात पाहुणे बनले कार्तिक आर्यन, फुकटात केला डान्स; पण पायलट जिजांकडून मिळाली एक मानाची भेट

स्वतःच्या बहिणीच्या लग्नात पाहुणे बनले कार्तिक आर्यन, फुकटात केला डान्स; पण पायलट जिजांकडून मिळाली एक मानाची भेट

‘द ग्रेट इंडियन कपिल शो’चा सीझन 4 नुकताच सुरू झाला असून, प्रेक्षकांकडून या शोला भरभरून प्रतिसाद मिळत आहे. विनोद, मजेशीर किस्से आणि सेलिब्रिटी गेस्ट्समुळे हा शो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. शोच्या ताज्या एपिसोडमध्ये अभिनेता कार्तिक आर्यन (Kartik Aaryan)आणि अभिनेत्री अनन्या पांडे हजेरी लावताना दिसले. दोघांची नुकतीच प्रदर्शित झालेली रोमँटिक फिल्म ‘तू मेरी, मैं तेरा…’ यानिमित्ताने ही जोडी शोमध्ये आली होती.

एपिसोडदरम्यान अनन्या पांडेनं प्रेम आणि डेटिंग लाइफबाबत आपली मते मांडली, तर कार्तिकने आपल्या वैयक्तिक आयुष्यातील खास आणि मजेशीर गोष्टी प्रेक्षकांसोबत शेअर केल्या. विशेष लक्ष वेधून घेतलं ते कार्तिकच्या बहिणीच्या लग्नाशी संबंधित किस्स्यांनी.

या भागात कार्तिकची बहीण कृतिका तिवारी आणि तिचे पायलट पती तेजस्वी कुमार सिंह देखील उपस्थित होते. होस्ट कपिल शर्माने नेहमीच्या स्टाईलमध्ये कार्तिकची चेष्टा करत म्हटलं की, “तू या शोचा रेग्युलर मेंबर झालास. तुझी आई, वडील, बहीण आणि तुझा डॉग कटोरी सुद्धा इथे येऊन गेला आहे.” यानंतर कपिलने कार्तिकच्या जीजांचेही मजेशीर स्वागत केलं आणि “तुम्ही इथे बसलात म्हणूनच फ्लाइट्स उडत नाहीयेत” असा टोमणा मारला.

कार्तिकच्या जीजांनीही कपिलच्या प्रश्नांना तितक्याच मजेशीर उत्तरांनी प्रतिसाद दिला. त्यांनी आपली लव्ह स्टोरी सांगताना “फ्लाइट ऑटो-पायलटवर चालली” अशी गंमतीशीर टिप्पणी केली. कपिलने त्यांना कार्तिकचा जीजा असल्याचा गर्व केला आहे का, असे विचारल्यावर त्यांनी नम्रपणे नकार दिला.

बहिणीच्या लग्नाबाबत कार्तिकने सांगितलं की, तो लग्नात केवळ पाहुणा म्हणून गेला होता. मात्र त्याने मनापासून डान्स केला आणि त्यासाठी एकही रुपया घेतला नाही. जीजांकडून काही पैसे मिळाले का, असे विचारल्यावर बहिणीने “जुता चोराईचा नेग यालाच मिळाला” असे सांगितले, ज्यावर कार्तिकने हसत स्वीकार केल्याचे सांगितले. एकूणच, हा एपिसोड विनोद, कौटुंबिक गप्पा आणि सेलिब्रिटी किस्स्यांनी भरलेला ठरला.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा
क्रिकेटर आणि या बॉलिवूड स्टार्सच्या नावाचा गैरवापर; एजन्सीच्या 3 कर्मचाऱ्यांनी केली करोडोंची फसवणूक

हे देखील वाचा