Tuesday, June 24, 2025
Home बॉलीवूड बऱ्याच मोठ्या शोध मोहिमेनंतर अखेर कार्तिक आर्यनला मुंबईत मिळाले मनाजोगे घर, ‘हा’ सुपरस्टार आहे घरमालक

बऱ्याच मोठ्या शोध मोहिमेनंतर अखेर कार्तिक आर्यनला मुंबईत मिळाले मनाजोगे घर, ‘हा’ सुपरस्टार आहे घरमालक

मुंबई सारख्या शहरात घर शोधणे म्हणजे समुद्रात पिन शोधण्यासारखे आहे. या शहारत आपले एक घर असावे अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. आपले घर हे मनाजोगे, योग्य ठिकाणी, सर्व सोयींनी भरपूर असावे अशी सगळ्यांचीच इच्छा असते. यासाठी सामान्य व्यक्तींपासून ते कलाकारांपर्यंत सर्वांनाच अशा घराचा शोध घ्यावा लागतो. अभिनेता कार्तिक आर्यन देखील मागील बऱ्याच काळापासून मुंबईमध्ये घर शोधत होता मात्र त्याला त्याच्या आवडीचे घर काही मिळत नव्हते. पण आता त्याचा हा शोध संपला असून, कार्तिकला त्याच्या आवडीचे घर मिळाले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by KARTIK AARYAN (@kartikaaryan)

प्राप्त होणाऱ्या माहितीनुसार कार्तिकला मुंबईच्या जुहू परिसरातील एक घर आवडले आहे. कार्तिक काही दिवसांपूर्वीच जुहू इथे असणाऱ्या शाहिद कपूरच्या घरी गेला होता. त्याला हे घर खूप आवडले आणि त्याने ते भाड्याने घेण्याचे ठरवले आहे. कार्तिकला शाहिदचे घर पाहताचक्षणी आवडले आणि त्याने ते भाड्याने घेण्याचे ठरवले आहे. तीन वर्षांसाठी कार्तिक हे घर घेणार आहे. या घरासाठी कार्तिकने ४५ लाख रुपये डिपॉझिट भरले असून, पहिल्या वर्षी दर महिन्याला घराचे भाडे ७.५० लाख इतके असणार आहे. तर दुसऱ्या वर्षाला ८.२० लाख आणि तिसऱ्या वर्षाला ८.५८ लाख भाडे त्याला द्यावे लागणार आहे. शाहिदचे हे शानदार घर ३.६८१ स्क्वेयर फूट एवढे मोठे असून, यात दोन कार पार्किंग देखील उपलब्ध आहेत. कार्तिकची आई आणि शाहिदची बायको मीरा यांनी सर्व व्यवहार पूर्ण केले आहे. आता लवकरच ते इकडे शिफ्ट होणार आहे.

सध्या शाहिद आणि मीरा त्यांच्या प्रभादेवी येथील डुप्लेक्स घरात राहत आहे. तर कार्तिक आता त्याच्या जुन्या घरात शिफ्ट होईल. कार्तिकच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर लवकरच तो त्याच्या आगामी शेहजादा या सिनेमात दिसणार असून, या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. यात तो कृती सेननसोबत रोमान्स करताना दिसेल.

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
हंसिका मोटवानीच्या लग्नावर येतोय नवीन शो, ‘या’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर होणार प्रदर्शित
आरोह वेलणकरने पोस्ट शेअर करत बिग बॉसमधल्या ‘त्या’ अनुभवांबद्दल व्यक्त केल्या भावना

हे देखील वाचा